scorecardresearch

Premium

सांगली : अवकाळी पावसाची रात्रपाळी

अवकाळी पावसाने तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ आणि पलूस या चार तालुक्यांत रात्रभर धिंगाणा घातल्याने द्राक्ष बागायतदारांच्या तोंडचे पाणी पळविले आहे.

Rain overnight talukas Sangli district
सांगली : अवकाळी पावसाची रात्रपाळी (प्रातिनिधिक छायाचित्र)

सांगली : अवकाळी पावसाने तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ आणि पलूस या चार तालुक्यांत रात्रभर धिंगाणा घातल्याने द्राक्ष बागायतदारांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. मांजर्डे (ता. तासगाव), अंकलखोप (ता. पलूस) आणि बुधगाव (ता.मिरज) या ठिकाणी अतिवृष्टीसदृश्य पावसाची नोंद झाली. आज सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी २१.१ मिलीमीटर पाऊस झाला असून सर्वाधिक पाऊस पलूस तालुक्यात झाला.

गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचे थैमान सुरू असून गुरुवारी रात्री तर चार तालुक्यांत अवकाळीने थैमानच घातले. रात्रभर पडणार्‍या पावसाने द्राक्ष बागा, उस व भाजीपाल्याचे फड, ज्वारी, गहू या पिकात गुडगाभर पाणी साचले असून हंगामात भरून न वाहिलेले नाले सकाळी तुडुंब भरून वाहत होते.

Unseasonal rain Washim
वाशिममध्ये अवकाळी पाऊस, गारपीट; हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने बळीराजा हवालदिल
Unseasonal rain Buldhana district
बुलढाणा जिल्ह्यावर निसर्ग कोपला! गारपीटसह अवकाळीचे थैमान; रब्बी पिकांची प्रचंड हानी
washim youth killed marathi news, washim crime news, youth killed with axe marathi news
वाशीम : क्षुल्लक वाद अन् मित्रावर कुऱ्हाडीने सपासप वार!
girlfriend boyfriend dead Pardi
वर्धा : १५ दिवसांपासून बेपत्ता प्रेमीयुगुल मृतावस्थेत आढळले, दोघांनी पायाला ओढणी बांधून…

हेही वाचा – पंढरीच्या विठूराया चरणी ४ कोटी ७७ लाख रुपये दान! कार्तिकी यात्रेत गतवर्षीपेक्षा १.५६ कोटी रुपयांची वाढ

अंकलखोप, भिलवडी, नागठाणे परिसरात रात्रीमध्ये ६४.५ मिलीमीटर पाऊस झाला असून मांजर्डे (ता.तासगाव) आणि बुधगाव (ता. मिरज) येथे ६२.३ मिलीमीटर पाऊस झाल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाकडून देण्यात आली. जिल्ह्यात सरासरी २१.१ मिलीमीटर पाऊस गुरुवारी रात्री झाला असून तालुकानिहाय पाऊस असा मिरज २८, जत ४.४, विटा २७.१, वाळवा १७.५, तासगाव ३८.२, शिराळा ५.८, आटपाडी १०.५, पलूस ४० आणि कडेगाव २३.१ मिलीमीटर.

हेही वाचा – सातारा : धनगर आरक्षणासाठी खंडाळ्यात महामार्ग रोखला; पुणे, साताऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावर १५ किमी रांगा

अवकाळी पावसाने मिरज पूर्व भाग, पलूस, तासगाव, कवठेमहांकाळ या द्राक्ष पट्ट्यात मोठी हानी झाली असून फुलोर्‍यात असलेले घड कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर आगाप छाटणी झालेल्या बागेतील मणी तडकण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे यंदा हातातोंडाला आलेले पिक वाया जाण्याची भीती निर्माण झाली असून दमट हवामानामुळे दावण्याचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच तयार द्राक्षातील साखर रिव्हर्स जाण्याची लक्षणे दिसत असून यामुळे गोडीवर परिणाम होणार आहे. पलूस तालुक्यात तोडणीला आलेल्या उसाचेही नुकसान होणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rain overnight in four talukas of sangli district ssb

First published on: 01-12-2023 at 17:57 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×