गारांचे तांडव !

महाराष्ट्रावर गेल्या काही दिवसांपासून ओढवलेले गारपिटीचे संकट आता अधिकच गडद होत चालले असून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भात गारांच्या वर्षांवामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

महाराष्ट्रावर गेल्या काही दिवसांपासून ओढवलेले गारपिटीचे संकट आता अधिकच गडद होत चालले असून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भात गारांच्या वर्षांवामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. उभ्या पिकांचा पुरता नाश करणाऱ्या गारपिटीचा सर्वाधिक फटका मराठवाडय़ाला बसला असून शुक्रवारी नांदेडमध्ये गारांच्या तडाख्याने पाचशे ससे तर लातूरमध्ये दीड हजार कोंबडय़ाही बळी पडल्या.
एरवी पावसाविना पाणीटंचाईचा ओरड सुरू असलेल्या मराठवाडय़ात यंदा मात्र अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीपिकांची मोठी वाताहत केली आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज सुरू असलेल्या गारपिटीने शुक्रवारी दिवसभर उसंत घेतली. मात्र, सायंकाळी साडेचारनंतर पुन्हा जोरदार पावसाला सुरुवा्रत झाली. लातूर
जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील सुमारे ३० गावांना गारपिटीने झोडपून काढले.
दरम्यान, नांदेड जिल्ह्य़ाच्या लोहा तालुक्यातील घोडज गावच्या परिसरात मोठय़ा आकाराच्या गारांच्या वर्षांवात सुमारे ४०० ससे आणि काही मोर मृत्युमुखी पडले. ही घटना ताजी असतानाच निलंगा तालुक्यातील आनंदवाडी येथे एका शेतकऱ्याच्या कुक्कुटपालन प्रकल्पावर पडलेल्या गारांचे ओझे एवढे झाले, की याचे छत कोसळून त्याखाली सुमारे दीड हजार कोंबडय़ा मरण पावल्या. मराठवाडय़ात यंदा गारपिटीमुळे लहान-मोठी मिळून १४८ जनावरे यापूर्वी दगावली आहेत.

सध्याची गारपीट का व कशामुळे?
* पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे (वेस्टर्न डिस्टर्बन्सेस) हिमालयाच्या पट्टय़ात हिमवृष्टी होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या वाऱ्यांचा प्रभाव दक्षिणेपर्यंत पोहोचला आहे. याशिवाय अतिशय उंचीवरून वाहणाऱ्या कोरडय़ा वाऱ्यांचे प्रवाह (जेट प्रवाह) दक्षिणेकडे सरकले आहेत.
* त्याच वेळी बंगालच्या उपसागराकडून महाराष्ट्राकडे येणारे वारे बाष्प घेऊन येत आहेत. सध्या कोरडे वारे हवेच्या वरच्या थरात, तर बाष्पयुक्त वारे खालच्या थरात आहेत.  
* या स्थितीत बाष्पयुक्त वारे खूप उंचीपर्यंत जातात. ते वर गेले की बाष्प गोठते व त्याचे रूपांतर गारांमध्ये होते. हवामानाची ही स्थिती बरेच दिवस कायम आहे. त्यामुळे महाराष्ट्राला भयंकर गारपीट सहन करावी लागत आहे.
(नॅशनल क्लायमेट सेंटरचे संचालक
डॉ. ए. के. श्रीवास्तव आणि पुणे वेधशाळेच्या अधिकारी डॉ. सुनीता देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rains hailstorm in maharashtra destroy winter crops

Next Story
‘कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही’!
ताज्या बातम्या