अलिबाग- रायगड जिल्ह्यात पावासाचा जोर पुन्हा एकदा वाढला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १४१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

   हवामान विभागाने रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने दिडहजारहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले आहे. दरडप्रवण गावांना तसेच सखल भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. एनडीआरएफची दोन पथके महाड परिसरात तैनात करण्यात आली आहे.

heat in thane, thane district, heat still continue, murbad register highest temperature, 41 degree celsius,
तापमानात घट पण उकाडा कायम; मुरबाड सर्वाधिक ४१ अंशावर, जिल्ह्यात सरासरी तापमान ३९ अंशावर
Average temperature in Thane district at 42 degrees Celsius
मंगळवार ठरला उष्णवार! ठाणे जिल्ह्यात सरासरी तापमान ४२ अंश सेल्सियसवर
water shortage Nashik district
नाशिक : पाणी टंचाईचे नाशिक जिल्ह्यात दोन बळी, मायलेकीचा विहिरीत पडून मृत्यू
Unseasonal rains in Washim district
वाशीम जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

   जिल्ह्यात २४ तासात सरासरी १४१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यात अलिबाग १२१, पेण १९२, मुरुड १४२,  पनवेल १५१, उरण १४०, कर्जत १२३, खालापूर २०१, माणगाव १०५, रोहा १५५, सुधागड १५०, तळा १७७, महाड ९८, पोलादपूर ११९, म्हसळा १२५, श्रीवर्धन ९५, माथेरान १६२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जुलै महिन्यात पहिल्या पाच दिवसात सरासरी ४८० मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे नद्या नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. धरणांच्या तसेच लुघपाटबंधारे प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे.

    बुधवारी सकाळी आठच्या सुमारास कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. नदी इशारा पातळी २३ मीटर असून ही नदी २३.१० मीटरवर वाहत आहे. नदीने २३.९५ धोका पातळी ओलांडल्यास नदी किनाऱ्यांवरील गावांना पूराचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाताळगंगा, आंबा, सावित्री, उल्हास आणि गाढी या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असली तरी त्या इशारा पातळी खाली वाहत आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.