पंढरपूर : गेली ६० वर्षे त्याच प्रश्नावर निवडणूक होती. तुम्ही सर्वजण निवडणून देता. मात्र त्यांना एकदा तरी विचारा, आमचे प्रश्न का सुटले नाहीत. निवडून आलेले तुमचे गुलाम आहेत. तुम्ही गुलाम होऊ नका. एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संधी द्या बघा कसे वठणीवर आणतो असे म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर तोफ डागली. यावेळी त्यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेवरही टीका केली.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे व जिल्ह्यातील उमेदवारांसाठी मंगळवेढा येथे मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. लातूर येथील सभा आटोपून ठाकरे सोलापूर मार्ग मंगळवेढा येथे आले. सभेला सुरुवात करताना तुमचे दर्शन घेण्यासाठी आणि दिलीप धोत्रे व आमच्या उमेदवारांना आशीर्वाद द्या, यासाठी आलो, असे म्हणत ठाकरे यांनी आपल्या शैलीत भाषण केले. मी मंगळवेढा येथे येण्यापूर्वी माहिती घेतली तर म्हणे हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. गेली ६० वर्षे पाणी, वीज, शेती, रोजगार हे प्रश्न सोडवू, आम्हाला मत द्या, असे म्हणत चारही पक्षांनी आलटून पालटून सत्ता भोगायची आणि प्रश्न तसेच ठेवायचे. तुम्ही त्यांना जाब विचारा ? का प्रश्न सुटला नाही. निवडणून आलेले तुमचे गुलाम आहे. तुम्ही गुलाम होऊ नका, असे राज यांनी ठणकावून सांगितले.

What Ajit Pawar Said About Sharad Pawar?
Ajit Pawar : “शरद पवारांचं राजकारण मलाच नाही तर महाराष्ट्रात कुणालाच…”, अजित पवार काय म्हणाले?
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
Dhananjay Munde On Parli Assembly Constituency
Dhananjay Munde : “माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना…”; धनंजय मुंडेंच्या विधानाचा रोख कुणाकडे?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!

हेही वाचा >>>Dhananjay Munde : “माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना…”; धनंजय मुंडेंच्या विधानाचा रोख कुणाकडे?

मी तुमच्या गावात रोजगार आणून देणार. राज ठाकरे आपणास शब्द देतो. शेतकरी आत्महत्या करत आहेत. महिला सुरक्षित नाहीत. मुलींना पळवले जाते, अत्याचार होतात. राज ठाकरे यांना संधी द्या. कसं वठणीवर आणतो, ते बघा, असे ते म्हणाले. एकीकडे लाडकी बहीण म्हणून पैसे द्यायचे आणि दुसरीकडे भाववाढ करून वसूल करायचे. लाडके भाऊ मेले काय ? असा सवाल उपस्थित करत या योजनेवर ठाकरे यांनी टीका केली. २०१४ साली मनसेने विकास आराखडा मांडला होता. कोणत्याही पक्षाने असे धाडस दाखवले नाही. निवडणूक आली की भूलथापा द्यायच्या, पैसे वाटायचे आणि सत्तेत जायचे हेच चालू आहे. चार पक्षांनी आजार बरे झाले नाही, पाचवे औषध म्हणून मनसेला संधी देऊन बघा, असे म्हणत मनसेच्या सर्व उमेदवारांना तुमचे मत द्या, असे आवाहन राज यांनी केले.

Story img Loader