भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांची नोट वितरणातून काढून टाकली. यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या निश्चलनीकरणाच्या धोरणाला धरसोड करण्याचा प्रकार म्हटलं. तसेच नव्या नोटा आणल्या तेव्हा त्या मशीनमध्ये जातात की नाही हेही बघितलं नसल्याचं सांगत टीका केली. ते शनिवारी (२० मे) नाशिक दौऱ्यावर आले असताना माध्यमांशी बोलत होते.

“नव्या नोटा आणताना त्या मशीनमध्ये जातात की नाही हेही बघितलं नव्हतं”

राज ठाकरे म्हणाले, “मी नोटबंदी झाली त्याचवेळी एक भाषण केलं होतं. हा धरसोड करण्याचा प्रकार आहे. तज्ज्ञांना विचारून या गोष्टी झाल्या असत्या, तर ही वेळ आली नसती. कधी एखादी गोष्ट आणायची, कधी बंद करायची. त्यावेळी नोटा आणल्या, तर त्या एटीएममध्येही जात नव्हत्या. म्हणजे नोटा आणताना त्या मशीनमध्ये जातात की नाही हेही बघितलं नव्हतं.”

Devendra Fadnavis On Praful Patel Statement
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते”; प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “हे सत्य…”
eknath shinde raj thackeray (2)
राज ठाकरेंचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
MNS-BJP Alliance
मनसे महायुतीत येणार का? पाडवा मेळाव्याआधी देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान; म्हणाले, “राज ठाकरे हे पहिले व्यक्ती…”
Chandrasekhar Bawankule reaction
एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया, म्हणाले, “मोदींच्या विकसित भारत संकल्पासाठी…”

“हे असले निर्णय देशाला परवडणारे नसतात”

“हे असले निर्णय देशाला परवडणारे नसतात. आता पुन्हा लोकांनी बँकेत पैसे टाकायचे. पुन्हा हे नव्या नोटा आणणार. हे असं सरकार चालत नाही. असे प्रयोग केले जात नाहीत,” असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं.

हेही वाचा : VIDEO: आरबीआयने २ हजारच्या नोटा वितरणातून काढल्या, केंद्रीय अर्थराज्यमंत्री कराड म्हणाले, “यानुसार…”

नोटबंदी फसली का? या पत्रकाराच्या प्रश्नावर राज ठाकरे संतापले

नोटबंदी फसली का? या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले, “मी या गोष्टी तेव्हाच बोललो होतो. मला जे प्रश्न विचारले जातात ते सरकारमधील लोक आल्यावर विचारले जात नाही. तेव्हा तोंड बंद असतं. मला हे प्रश्न विचारा म्हणून पत्रकारांना कुणी पाठवतं का?”