आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. सध्या त्यांची पुण्याच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू आहे. १९ ते २१ जुलै असा तीन दिवसांचा हा दौरा असणार आहे. राज संवाद उपक्रमाअंतर्गत, आज १९ जुलै रोजी सकाळी १० ते १ वेळेत वडगाव शेरी आणि शिवाजीनगर मतदारसंघाची सेनापती बापट रोडवरील, इंद्रप्रस्थ कार्यालय येथे बैठक होत आहे.

त्यानंतर दुपारी १ ते ४ वेळेत कोथरूड आणि खडकवासला माणिक बाग पेट्रोल पंपा समोरील, परिणय मंगल कार्यालयात होणार आहे. तर दुसर्‍या दिवशी मंगळवारी २० जुलै रोजी सकाळी १० ते १ वेळेत हडपसर आणि कॅन्टोन्मेंट विभागाची कोंढवा खुर्द येथील लोणकर लान्स येथे बैठक होणार असून, १ ते ४ दरम्यान कसबा आणि पर्वती विभागाची बिबवेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बैठक होणार आहे.

Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
Drain cleaning mumbai
नालेसफाईला सुरुवात, आतापर्यंत १५ टक्के गाळ काढला
Morbi bridge
१३५ जणांचा जीव घेणाऱ्या मोरबी पूल दुर्घटनेतील आरोपीला अखेर जामीन, पण कोर्टाने घातल्या ‘या’ अटी

दोन दिवसात शहरातील चारही भागात बैठका राज ठाकरे घेणार आहेत. त्या दरम्यान प्रत्येक पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेणार असल्याने, पुढील निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाचे जात आहे. तर दौऱ्याच्या तिसर्‍या दिवशी म्हणजेच बुधवारी करोना काळात ज्या संस्थांनी चांगले काम केले आहे. त्यांच्याशी विशेष संवाद साधणार असल्याची माहिती मिळत आहे.