मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलेच चर्चेत आले आहेत. आधी मनसेचा पाडवा मेळावा, नंतर ठाण्यात घेतलेली उत्तर सभा आणि शेवटी १ मे रोजी औरंगाबादमध्ये झालेल्या सभेदरम्यान राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांबाबत मांडलेल्या भूमिकेवरून राजकीय वातावरण तापलं आहे. मात्र, राजकीय आक्रमकता किंवा आरोप-प्रत्यारोपांप्रमाणेच राज ठाकरेंचा मिश्किल स्वभाव आणि हजरजबाबीपणा देखील नेहमीच चर्चेत असतो. त्याचाच प्रत्यय आज राज ठाकरेंनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित माध्यम प्रतिनिधींना आला. राज ठाकरेंनी यावेळी त्यांच्या खास शैलीत केलेल्या टिप्पणीनंतर उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला!

“…तर हनुमान चालीसा वाजणार म्हणजे वाजणार!”

राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांबाबत मनसेनं आजपासून सुरू केलेल्या आंदोलनाबाबत पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. “दिवसभर जी काही चार-पाच वेळा बांग दिली जाते, त्यांची प्रार्थना म्हणतात ती जर परत त्यांनी दिली तर आमचे लोक त्या त्या वेळा हनुमान चालीसा वाजवणार म्हणजे वाजवणार. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं पालन तुम्हाला करायचं असेल तर त्यांनी दिलेल्या डेसिबलचं पालन करावं लागेल. लोकवस्तीमध्ये ४५ ते ५५ डेसिबलपर्यंत स्पीकर लावू शकता. आम्हाला सणांसाठी दिवस बघून परवानगी देता आणि यांना ३६५ दिवस परवानगी देता ती कशासाठी? ४५ ते ५५ डेसिबल म्हणजे आमच्या घरचे मिक्सर जेवढे वाजतात तेवढा आवाज”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
Raj Thackeray
“शिंदे-फडणवीस मला सतत…”, राज ठाकरेंनी सांगितलं अमित शाहांची भेट घेण्याचं कारण
kirit somaiya
“…म्हणून काही तडजोडी केल्या”, किरीट सोमय्यांचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले, “आता मविआ सरकार असतं तर…”
supriya sule, ajit pawar, sunetra pawar
“दुसऱ्यांच्या घरात मी कशाला डोकावू?”, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे

“प्रार्थना तुमच्या घरात करा”

“कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित होतो याचा विचार त्यांनी करायचा. प्रार्थना म्हणू नका असं मी म्हणत नाही. तुमच्या घरात म्हणा. धर्म हा तुमच्या घरात असला पाहिजे. तुमच्या घरात प्रार्थना करा”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

राज ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले, “मला नांगरे-पाटलांचा फोन आलेला, सकाळची अजान…”

दरम्यान, राज ठाकरेंना यावेळी उपस्थित हिंदी वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी हिंदीमधून प्रतिक्रिया देण्याची विनंती करताच राज ठाकरेंनी त्यांचीच फिरकी घेतली. “माझं हिंदी एवढं चांगलं नाही रे”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. मात्र, आपल्या मिश्किल स्वभावानुसार त्यांनी नकलेच्या शैलीमध्ये प्रतिक्रिया द्यायला सुरुवात करताच उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.

MNS Andolan Live: ….तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार; राज ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

कार्यकर्ता का धरपकड्या…

मनसेच्या कार्यकर्त्यांची आज सकाळपासून अनेक ठिकाणी पोलिसांनी धरपकड केल्याच्या मुद्द्याविषयी बोलताना “हमारे कार्यकर्ता का धरपकड्या जो चल रहा है..” एवढं म्हणताच उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला. त्यानंतर पुन्हा एकदा राज ठाकरेंनी हिंदीमधून सविस्तर प्रतिक्रिया दिली.