लॉकडाउनने ‘हे’ शिकवलं तर सार्थक झालं – राज ठाकरे

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत मनेस अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकांना खास संदेश देत आवाहन केलं आहे.

संग्रहीत

करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन लागू करण्यात आला. लॉकडाउनमुळे सर्व नागरिकांना घरातच थांबावं लागले. त्यामुळे प्रदुषण तर कमी झालेच शिवाय… पक्षी आणि प्राण्यांना मोकळा श्वास घेता आल्याचं समोर आलं. हाच धागा पकडून आणि जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत नागरिकांना आवाहन केलं आहे.

गेल्या दोन महिन्यापासून देशभरात लॉकडाउन घेण्यात आला आहे. त्यामुळे गंगा नदीसारख्या अनेक नद्या स्वच्छ तर झाल्याच शिवाय मुंबई आणि दिल्लीसारख्या मेट्रो शहरातील प्रदुषण कमी झाले आहे. प्राणी आणि पक्षांनीही त्यामुळे मोकळा श्वास घेतला. याच अनुषंगाने आणि आज असणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत मनेस अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकांना खास संदेश देत आवाहन केलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत खात्यावरून ट्विट केलं आहे. त्यामध्ये ते म्हणाले आहेत की, आपण लॉकडाउनमध्ये आहोत म्हणून हे प्राणी पक्षी त्यांच्या हक्काच्या अधिवासात मुक्त संचार करू शकत आहेत. आपण त्यांच्या अधिवासावर अतिक्रमण केलंय त्यांनी आपल्या नाही; हे जरी ह्या टाळेबंदीने शिकवलं तरी #WorldEnvironmentDay चं सार्थक झालं म्हणता येईल, असं ठाकरे म्हणाले आहेत.

दरवर्षी ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे, हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Raj thackeray raj thackeray about lockdown and worldenvironmentday nck

Next Story
गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे
ताज्या बातम्या