Raj Thackray : महाराष्ट्राचा विकास आराखडा मांडणारा मनसे हा पहिला पक्ष आहे असं राज ठाकरेंनी ( Raj Thackeray ) म्हटलं आहे. तसंच शरद पवारांना संत म्हणत टोला लगावला आहे. यवतमाळच्या राळेगाव या ठिकाणी राज ठाकरेंनी सभा घेतली. त्यावेळी राज ठाकरेंनी ( Raj Thackeray ) लाडकी बहीण योजनेवरुनही टीका केली आणि शरद पवारांना जातीपातींमध्ये द्वेष पसरवणारे संत म्हणत त्यांच्यावरही टीका केली.

लाडकी बहीण योजनेवर काय म्हणाले राज ठाकरे?

लाडकी बहीण योजनेत अनेकांना पैसे मिळाले, काहींना नाही मिळाले. माझं सरकार आल्यानंतर मी फुकट गोष्टी देणार नाही. उलट माता भगिनींच्या हातांना मी काम देईन असं राज ठाकरे म्हणाले. सगळ्या बाजूंनी सत्यानाश होतो आहे. तुम्ही नीट पाहिलं पाहिजे, लोकांना समजावलं पाहिजे. आपण खड्ड्यात चाललो आहे असंही राज ठाकरे ( Raj Thackeray ) म्हणाले आहेत.

Sunil Tatkare Mahayuti
Sunil Tatkare : “सुनील तटकरे महायुतीला लागलेला कॅन्सर”, शिंदे गटाच्या आमदाराची घणाघाती टीका; महायुतीतील वाद चव्हाट्यावर!
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

आपल्याकडे शरद पवार नावाचे संत जन्माला आले त्यांनी जातीपातींमध्ये द्वेष पसरवला-राज ठाकरे

आपल्याला सध्या जातीपातींमध्ये गुंतवलं जातं आहे. प्रत्येकाची ओळख जातींमध्ये होते. याआधीही जाती होत्या. मला आत्ता माहीत नाही की माझ्याबरोबर बसलेले सहकारी कोणत्या जातीचे आहेत. मला त्याच्याशी काही घेणंदेणं नाही. स्वतःच्या जातीबद्दल प्रेम असणं स्वाभाविक आहे. मात्र गेल्या दहा ते पंधरा वर्षांत स्वतःच्या जातीबद्दल प्रेमापेक्षा दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष पसरवला गेला असा महाराष्ट्र नव्हता. छत्रपती शिवराय, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर कुणीही आम्हाला जातीपातींचा द्वेष शिकवला नाही. ना आमच्या साधू संतांनी जातींचा द्वेष शिकवला. पण आमच्याकडे एक संत जन्माला आले त्यांचं नाव शरदचंद्र पवार. त्या संताने हे सगळं विष पेरलं. हा महाराष्ट्र हिंदुत्वाने भारावला होता. तो महाराष्ट्र जातीपातींमध्ये तोडण्याचं काम शरद पवार यांनी केलं. हाताला काहीही लागणार नाही, या घाणेरड्या गोष्टींमुळे. या सगळ्याच्या जातीपातींपलिकडे माझा तरुण मोठा झाला पाहिजे तरुणी मोठ्या झाल्या पाहिजेत. असं राज ठाकरे ( Raj Thackeray ) म्हणाले.

हे पण वाचा- Video: “मी मुख्यमंत्री झालो तरी…”, राज ठाकरेंबद्दल बोलताना अमित ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाबाबत केलं भाष्य

मतदान म्हणजे शाहरुख सलमानचा सिनेमा नाही

मी आज तुम्हाला फक्त जागं करायला आलो आहे. महाराष्ट्राचं मतदान पाच वर्षांनी होणार आहे. शाहरुख खान आणि सलमान खानचा सिनेमा नाही. शुक्रवारी पडला तर सोमवारी दुसरा लागला. त्यामुळे मतदान प्रक्रियेकडे तुम्ही गांभीर्याने पाहिलं पाहिजे. २० तारखेला रेल्वे इंजिन या निशाणीवर अशोक मेश्राम यांना विजयी करा हे सांगायला मी आलो आहे असंही राज ठाकरे ( Raj Thackeray ) म्हणाले.

Story img Loader