मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी मांडलेली भूमिका वादाचा विषय ठरू लागली आहे. मशिदींवरील भोंगे न उतरवल्यास त्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवण्याचं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे. यामुळेच १ मे रोजी औरंगाबादमध्ये झालेल्या सभेसाठी पोलिसांनी सशर्त परवानगी दिली होती. या सभेमध्ये राज ठाकरेंनी भावना भडकावणारं भाषण केल्याचा आरोप करत पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आज ‘शिवतीर्थ’वर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी औरंगाबादमधील सभेसंदर्भात आपली भूमिका मांडली आहे.

“ही गोष्ट आमच्याच बाबतीत का होतेय?”

३ मेचा अल्टिमेटम संपल्यानंतर आजपासून मनसे कार्यकर्त्यांनी मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवण्याचं आंदोलन सुरू केलं आहे. पोलिसांनी काही ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड देखील केली. मात्र हे आमच्याच बाबत का होतं? असा सवाल राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे. “अनेक ठिकाणी आमच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा पाठवल्या जात आहेत. ही गोष्ट फक्त आमच्याच बाबतीत का होतेय? एवढाच फक्त प्रश्न आहे. जे कायद्याचं पालन करतायत त्यांना तुम्ही ताब्यात घेणार आणि जे पालन करत नाहीत त्यांना तुम्ही मोकळीक देणार”, असा मुद्दा राज ठाकरेंनी आज उपस्थित केला.

“हमारे कार्यकर्ता का जो धरपकड्या चल रहा है…”, हिंदी चांगलं नसल्याचं म्हणत राज ठाकरेंनी घेतली पत्रकारांची फिरकी!

राज ठाकरेंनी मौलवींचे मानले आभार

दरम्यान, यावेळी बोलताना ज्या मशिदींमध्ये सकाळजी अजान झाली नाही, तिथल्या मौलवींची राज ठाकरेंनी आज बोलताना आभार मानले. “आज ९०-९२ टक्के ठिकाणी सकाळची अजान झाली नाही. सर्व ठिकाणी आमचे लोक तयारच होते. मी खासकरून त्या मौलवींचे आभार मानेन की आमचा विषय त्यांना नीट समजला आहे”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. “मुंबईत ११४० मशिदी आहेत. त्यापैकी १३५ मशिदींवर सकाळची अजान ५ वाजायच्या आत लावली गेली. विश्वास नांगरे पाटलांचा काल फोन आला होता. सर्व मशिदींशी बोलल्याचं त्यांनी सांगितलं. मग या १३५ मशिदींवर राज्य सरकार कोणती कारवाई करणार आहे? की फक्त आमच्याच लोकांवर कारवाई करणार?” असा सवाल देखील राज ठाकरेंनी उपस्थित केला.

“तुम्हाला हिंदुत्वाचे धडे देणाऱ्यांची डिग्री…”, संजय राऊतांचा राज ठाकरेंना खोचक सल्ला; म्हणाले, “जरा डोकं ठिकाणावर ठेवून…!”

औरंगाबादमधील सभेबाबत राज ठाकरे म्हणतात…

औरंगाबादमधील सभेत भावना भडकावणारी विधानं केल्याचं बोललं जात असताना राज ठाकरेंनी त्यावर भूमिका मांडली. “तिथे अजान सुरू झाल्यानंतर मी पोलिसांना सांगितलं की ती बंद करा. जर भडकवायचंच असतं तर तिथे काय झालं असतं. आम्ही शांततेत समजावून सांगतोय. सरकारनेही ते शांतपणे समजून घ्यावं. आमच्या लोकांची धरपकड कशासाठी करताय?” असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.