राज ठाकरे आणि त्यांची गुढीपाडव्याच्या दिवशी झालेली सभा अजूनही चर्चेत आहे. या सभेतल्या त्यांच्या वक्तव्याचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. मशिदींवरच्या भोंग्यांबद्दलच्या राज ठाकरे यांच्या विधानामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतल्या काही मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. तसंच पुण्यात वसंत मोरे यांची शहराध्यक्ष पदावरूनही हकालपट्टी करण्यात आली. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा सुरू असतानाच आता ठाण्यात होणाऱ्या राज ठाकरेंच्या बहुचर्चित सभेचा टीझर मनसेना प्रदर्शित केला आहे.


ठाण्यात १२ एप्रिलला होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेचा टीझर मनसेकडून रिलीज करण्यात आला आहे. गुढीपाडव्याच्या सभेमध्ये राज ठाकरेंच्या भाषणावरील राजकीय प्रतिक्रियांना या सभेतून उत्तर दिलं जाणार आहे. राज ठाकरेंच्या १२ एप्रिलला पार पडणाऱ्या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

Baramati Namo Maharojgar Melava
निमंत्रण पत्रिकेतील आणखी एक घोळ सुधारण्यासाठी प्रशासनाची धावाधाव
Thane Housing Court
ठाणे हाऊसिंग अदालतीत तक्रारदारांना दिलासा, प्रलंबित १२० पैकी ११० तक्रारींवर निर्णय
mhaisal yojana marathi news, mhaisal project sangli marathi news, mhaisal sangli jat taluka water issue marathi news
जतमध्ये पाण्यावरून राजकीय श्रेयवाद उफाळून आला
Pune pubs
पुण्यात आता मध्यरात्री दीडपर्यंत ‘चिअर्स’… पब, मद्यालयांबाबत पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत याची माहिती दिली आहे. देशपांडे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शरद पवार, संजय राऊत आणि अजित पवार यांनी केलेल्या टीका आहेत. या सर्व टीकांवर राज ठाकरे ठाण्याच्या सभेत उत्तर देणार आहे. या सर्व टीकांना राज ठाकरे ‘करारा जवाब’ देणार असे म्हटले आहे.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणावर अजूनही चर्चा सुरु आहे. त्या सभेत राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे, मदरशांमधले गैरप्रकार यावर भाष्य केलं होतं.