Raj Thackeray Targets Sharad Pawar: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषद झाली. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंनी मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेतल्याची टीका त्यांच्यावर केली जात आहे. त्यातच शुक्रवारी बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यावर ‘सुपारीबाज’ म्हणत काही लोकांनी सुपाऱ्या फेकल्या. यावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. यासंदर्भात राज ठाकरेंनी आज संभाजीनगरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट भूमिका मांडली. यावेळी त्यांनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांचं नाव घेऊन थेट इशारा दिला आहे. तसेच, “माझ्या नादी लागू नका”, असंही राज ठाकरे यावेळी पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.

राज ठाकरेंनी काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना विधान केलं होतं. त्यावरून मराठा समाजात नाराजी असल्याचं सांगितलं जात आहे. “महाराष्ट्रात सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की आरक्षणाची गरजच नाही. आपल्याला केवळ पैशांचं व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे”, असं राज ठाकरे म्हणाले होते. आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं सांगतानाच राज ठाकरेंनी त्यामागची भूमिका स्पष्ट केली आहे.

Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Kolkata Rape and Murder Accused Sujoy Roy
Sunjoy Roy : कोलकाता प्रकरणातील आरोपी संजय रॉयला हवं चाओमिन, तुरुंगातली पोळी-भाजी पाहून संताप, म्हणाला..
Chanakya Niti These 5 things men should never tell anyone
Chanakya Niti : पुरुषांनी या ५ गोष्टी अजिबात कोणालाही सांगू नयेत, नाहीतर आयुष्यभर लोक तुमच्यावर हसतील
rahul gandhi on narendra modi in j&k election
Rahul Gandhi on PM Narendra Modi: “माझी पंतप्रधान मोदींबाबत अडचण ही आहे की…”, राहुल गांधींनी सांगितली दोन कारणं; म्हणाले…
MPSC ibps exam 25 august Protest girl presented a poem in the MPSC Protest video goes viral
तुम्हीच सांगा साहेब बापाला सांगू कसं? MPSC आंदोलनात विद्यार्थीनीचं सरकारकडे साकडं; VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी
suraj chavan angry on nikki watch promo
“बोलत नाही म्हणून गरीबांचा फायदा घेतात…”, निक्कीच्या ग्रुपशी भिडण्याचा सूरजचा निर्धार! नेटकरी म्हणाले, “गुलीगत पॅटर्न…”
Old man sell samosa poha on Road not for money motivational story of udaipur rajasthan
“पैशासाठी नाहीरे…” या आजोबांच्या कष्टामागचं कारण ऐकून तुमचाही जगण्याचा दृष्टीकोन बदलेल; वाचा नक्की काय घडलं?

“२००६ साली मी माझ्या पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत आमची एकच भूमिका राहिली आहे. आरक्षण द्यायचंच असेल तर आर्थिक निकषांवर द्यावं. त्यावर माझं म्हणणं आहे की महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही. देशात महाराष्ट्रासारखं दुसरं राज्य नाहीये. इथे इतक्या गोष्टी उपलब्ध असताना बाहेरच्या राज्यातल्या लोकांना इथे सगळ्या गोष्टी मिळत असताना आमच्या मुला-मुलींना त्या गोष्टी इथे मिळत नाहीत”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

Raj Thackeray on Sharad Pawar: “शद पवार, उद्धव ठाकरेंसारखी मंडळी…”, राज ठाकरेंचा थेट हल्लाबोल; बीडमधील ‘त्या’ प्रकाराबाबत केला गंभीर आरोप!

शरद पवार व उद्धव ठाकरेंवर टीकास्र

दरम्यान, यावेळी राज ठाकरेंनी शरद पवार व उद्धव ठाकरेंवर परखड शब्दांत टीका केली. “तुम्ही शरद पवारांचं राजकारण पाहिलं तर जेम्स लेन प्रकरणावरून यांनी सुरुवात केली. टप्प्याटप्प्याने त्यांनी हे केलं. स्वत:च्या जातीबद्दल वर्षानुवर्षं प्रेम असतं. पण दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणं हे शरद पवारांनी राष्ट्रवादी निर्माण केली तेव्हापासून सुरू केलं”, असं राज ठाकरे म्हणाले. “त्यांना वाटत असेल की त्यांचे इतके खासदार निवडून आलेत तर त्या खासदारकीवर यांनी जाऊ नये. यांचा राग देवेंद्र फडणवीसांवर असेल तर तुम्ही त्या पद्धतीने बोला. समाजांमध्ये कशाला भांडणं लावत आहात?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

raj thackeray on sharad pawar uddhav thackeray
राज ठाकरेंचा शरद पवारांवर थेट हल्लाबोल! (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

राज ठाकरेंचा थेट इशारा

यावेळी पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी थेट इशारा दिला आहे. “माझ्या दौऱ्यात या लोकांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले. उद्या जर माझं मोहोळ उठलं तर निवडणुकीच्या काळात एकही सभा यांना घेता येणार नाही. त्यामुळे यांनी माझ्या वाट्याला जाऊ नये. मी मागेच म्हटलं होतं, यांच्याकडे प्रस्थापित आहेत, माझ्याकडे विस्थापित आहेत. यांनी माझ्या नादी लागू नये. तुम्हाला तुमचं राजकारण करायचंय, तुम्ही करा. समाजात तेढ निर्माण करून, विष कालवून यांना कुठलं राजकारण करायचंय? यांच्या राजकारणाचा बेसच हा आहे”, असं राज ठाकरे म्हणाले.

“२००३-०४ चा विषय असेल. तेव्हा पहिल्यांदा मराठा समाजाच्या आरक्षणासाठीचा मोर्चा मुंबईत आला होता. तिथे व्यासपीठावर भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि इतर काही नेते होते. सगळ्यांनी एकमुखानं सांगितलं होतं की मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं. मग अडवलं कुणी पुढे? तुमच्या सगळ्यांचं एकमत असेल तर गेल्या १५-२० वर्षांपासून हे होत का नाहीये?” असा प्रश्न राज ठाकरेंनी सर्वपक्षीय नेत्यांना केला.

Raj Thackeray : राज ठाकरेंचा ताफा अडवल्याप्रकरणी संदीप देशपांडेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले, “शेवट…”

“मोदींनी बारामतीत सांगितलं होतं की मी शरद पवारांचं बोट पकडून राजकारणात आलो. मग त्याच शरद पवारांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत मोदींकडे शब्द का नाही टाकला? हेच उद्धव ठाकरे आधीची ५ वर्षं भाजपाबरोबर केंद्रात, राज्यात नांदत होते. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी त्यांनी शब्द का नाही टाकला? जरांगे पाटलांच्या पाठीमागून यांचं राजकारण मतं मिळवण्यासाठी चालू आहे. तुमचं राजकारण तुम्हाला लखलाभ, माझ्या नादी लागू नका. माझी पोरं काय करतील हे यांना कळणारही नाही. नंतर घरी येऊन आरशापुढे पाठ, पोट आणि गालपण बघावे लागतील”, असा इशाराही राज ठाकरंनी दिला आहे.

“निवडणुका येतील-जातील, पण घाव भरून निघणार नाहीत”

“शरद पवारांच्या वयाचा बुजुर्ग नेता महाराष्ट्रात आज नाही. शरद पवारांनी भूमिका घेतली पाहिजे की हे असलं जातीय राजकारण महाराष्ट्रात पसरता कामा नये. पण तुम्हीच याला हातभार लावताय का? तुम्ही सांगता की महाराष्ट्राचा मणिपूर होईल? जातीत विद्वेष पसरवायचा याव्यतिरिक्त यांचं दुसरं काही राजकारण नाहीये. माझी सर्व समाजाच्या बांधवांना विनंती आहे, यांच्या नादी लागू नका. निवडणुका येतील-जातील. पण या जखमा भरून निघणार नाहीत”, असं आवाहन राज ठाकरेंनी नागरिकांना केलं आहे.