मनसे प्रमुख राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेवरून आणि एकंदरीतच राज ठाकरेंच्या भाषणावरून चांगलंच राजकारण तापलंय. राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांवर राष्ट्रवादीचे नेते प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. तर, पूर्वी मनसेत असलेल्या आणि काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत आलेल्या रुपाली ठोंबरे पाटील यांनीही राज ठाकरेंच्या भाषणावरून त्यांच्यावर टीका केली आहे. तसेच राज ठाकरे ईडीला घाबरत असल्याचं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय.

शरद पवार जातीचं राजकारण करतात; राज ठाकरेंच्या आरोपांवर रुपाली पाटील म्हणाल्या, “राष्ट्रवादीत जातीवाद…”

रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या की, “भाजपा पूर्वीपासूनच राज ठाकरेंचा वापर करून घेण्याचा प्रयत्न करत होता. आजही ते तेच करत आहेत. जेव्हा भाजपावर जेव्हा युती करायची वेळ येते तेव्हा ते सांगतात की मनसेसोबत आमची युती शक्य नाही. परंतु भाजपाने सातत्याने ज्या ईडीच्या कारवाया लावल्या आहेत, तिथे कुठेतरी राज ठाकरेंनी भाजपाविरोधात भूमिका न घेणं याचं मूळ दडलेलं आहे. देशातील नेते शरद पवार हे एकमेव नेते आहेत, जे ईडीला घाबरले नाहीत. ते ईडीच्या दबावाला आणि कारवाईला न घाबरता ते सामारे गेले.”

“तडीपार असलेले अमित शाह गृहमंत्री झाले तर…”; राज ठाकरेंना रुपाली ठोंबरे पाटलांचं प्रत्युत्तर

“राज ठाकरे हे फायरब्रँड नेते आहेत. परंतु कालच्या त्यांच्या भाषणात ईडीच्या कारवाईचा प्रभाव दिसत होता. त्यांचं भाषण त्याच दिशेने संपत होते. तसेच त्यांनी राज ठाकरे जे बोलतात ते अख्खा महाराष्ट्र डोक्यावर घेतो आणि त्यांनी आवाहन केल्यानंतर ते काम करायला कार्यकर्ते रस्त्यावर येतात,” असं रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या.