सांगली बाजार समितीमध्ये यंदाच्या हंगामातील मुहूर्ताच्या सौद्यामध्ये राजापुरी हळदीला क्विंटलला दहा हजार १०० रुपयांचा दर मिळाला. मुहूर्ताच्या सौद्यामध्ये ८६२ पोती राजापुरी हळदीची आवक झाली असून, सरासरी दर सात हजार ५०० रुपये मिळाला आहे. पहिल्याच सौद्यात चांगला दर मिळाल्यामुळे शेतकरी समाधानी असून, भविष्यातही दर तेजीत राहतील, असा व्यापाऱ्यांनी अंदाज वर्तविला आहे.
नवीन राजापुरी हळद शेतीमाल सौद्याचा शुभारंभ जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुले यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी तहसीलदार डी. एस. कुंभार, पोलीस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी, उपनिबंधक सुनिल चव्हाण उपस्थित होते. जिल्हा उपनिबंधक महेश सुरवसे व सचिव महेश चव्हाण यांच्या हस्ते हळदीचा सौदा काढण्यात आला. यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा, अडत संघटनेचे अध्यक्ष अमर देसाई, हळद खरेदीदार संघटनेचे अध्यक्ष सतीश पटेल, गोपाळ मर्दा, मनोहर सारडा आदी उपस्थित होते.
हेही वाचा – किरीट सोमय्यांचे नाव घेताच संजय राऊत संतापले, म्हणाले “तो माणूस हलकट…”
हेही वाचा – पुणे-सोलापूर महामार्गावर बसची ट्रकला धडक; पोलीस कर्मचाऱ्यासह चार जण ठार, १५ जखमी
नवीन हळद सौद्याचा शुभारंभ मे. गणपती जिल्हा कृषि औधेगिक सह सोसायटी प्लॉट नं. १ या दुकानातून झाला. या दुकानामधील हळद सौद्यामध्ये तासगाव तालुक्यातील पेड गावचे शेतकरी विनोद शिवाजी शेंडगे यांच्या राजापूरी हळदीला क्विंटलला दहा हजार शंभर इतका सर्वोच्च दर मिळाला. सदरची हळद मनाली ट्रेंडींग कंपनी यांनी खरेदी केली आहे. सदरच्या हळद सौद्यात यासाठी किमान ५ हजार व जास्तीजास्त १०१००/- दर मिळाला. सरासरी दर ७५००/- (सात हजार पाचशे ) इतका दर मिळाला आहे. सौद्यामध्ये ८६२ पोती नविन स्थानिक हळदीची आवक विक्री झाली.