राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. डॉक्टरांनीच शरद पवारांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता. मागील तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. यावर आता माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राजेश टोपे 'एबीपी माझा'शी बोलत होते. "दिवाळीत किमान ५० हजार लोकांना शरद पवार भेटले होते. लोकांना भेटल्यामुळे, बोलल्यामुळे संसर्ग झाला आहे. परंतु, त्यांची तब्येत ठीक असून, इच्छाशक्तीच्या बळावर ते लवकर बरे होतात. मोठ्या आजारांना त्यांनी हरवलं, न्युमोनिआ किरकोळ विषय आहे," असा विश्वास राजेश टोपे यांनी व्यक्त केला. हेही वाचा : “पोलिसांना काय झालं माहिती नाही, ते अचानक…”, नेमकी दुखापत कशी झाली, नितीन राऊतांनी सांगितला घटनाक्रम! "न्युमोनिआ बद्दल रोजच्या रोज तपासणी केली जाते. त्यानुसार डॉक्टर सल्ला देत राहतात. शरद पवार यांना आराम करण्याची गरज आहे. परंतु, शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबीराला ते उपस्थित राहतील. त्यानंतर थोडा आराम करतील. परत आपल्या नियमीत कामाला लागतील, अशी आशा आहे. मला शरद पवारांनी कारखाना सुरु केला का? मोळी टाकली का?," असेही विचारल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं.