सध्या राज्यात ९ हजार सक्रिय करोना रुग्ण असून आहेत. तिसऱ्या लाटेतील करोना बाधितांची दररोजची संख्या ही ४८ हजारापर्यंत गेली होती. परंतु आता राज्यातील करोनाची तिसरी लाट आटोक्यात आली असून हा चिंतेचा विषय नक्कीच नाही. त्यामुळे ही तिसरी लाट संपली, असं माझं वैयक्तिक मत आहे. असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपण जे परीणाम भोगले, त्यामुळे राज्यातील कोरोना एकदम संपला आहे अशी भूमिका घेऊन चालणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. सध्या आपण निर्बंध मुक्तीकडे वाटचाल करत आहोत. मात्र, मास्कमुक्तीचा निर्णय घेताना घाईगडबड चालणार नाही. हा निर्णय विचार करूनच घ्यावा लागेल, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

There is a possibility of a code of conduct for the upcoming Lok Sabha elections
पिंपरी: आचारसंहितेच्या शक्यतेने राजकारण्यांप्रमाणेच प्रशासकांचीही धावपळ; तब्बल ‘इतक्या’ कोटींच्या कामांना मंजुरी
maratha reservation
मराठा समाजाला दहा टक्के आरक्षणाचा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित, आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान
gurmeet ram rahim
“राम रहीमला पॅरोल देण्यापूर्वी…”, उच्च न्यायालयाचा हरियाणा सरकारला दणका; म्हणाले, “तुम्ही अशा किती गुन्हेगारांना…”
Charity Commissioner in High Court
निवडणूक कामे करा, अन्यथा फौजदारी कारवाई; सरकार-निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात धर्मादाय आयुक्त उच्च न्यायालयात

टोपे यांच्या हस्ते आज जालन्यातील महिला आणि बाल रुग्णालयात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला, यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. राज्यातील नागरीकांना सरसकट बूस्टर डोस देण्यात यावा, अशी कोणतीही मागणी राज्याच्या टास्क फोर्सने केलेली नाही. बूस्टर डोस नागरीकांना देण्याबाबत केंद्र सरकार जो निर्णय घेईल त्या प्रमाणे नागरीकांना बूस्टर डोस दिला जाईल असंही टोपे म्हणाले.

मुंबईत करोनावरील दीड लाख डोसची एक्सपायरी डेट जवळ आल्याने आरोग्य विभागासमोर हा चिंतेचा विषय नक्कीच आहे. मात्र राष्ट्रीय पातळीवर त्या बाबतचा निर्णय घेतला जाईल, असं देखील त्यांनी म्हटलं आहे. जालन्यातील पल्स पोलिओ लसीकरण कार्याक्रमाला यायला ईतर कार्यक्रमामुळे उशीर झाला असला तरी लसीकरण सकाळीच सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या असंही टोपे यांनी सांगितलं.