राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आता अडीच वर्ष पूर्ण होत असताना भाजपाकडून २०२४ची हाक देण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी २०२४मध्ये पुन्हा एकदा भाजपाचं सरकार आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारसमोरील अडचणी अजून वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण सरकारला पाठिंबा देणारा एक घटकपक्ष असलेल्या राजू शेटींनी स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधून बाहेर पडणार असल्याबाबत सूचक विधान केलं आहे. यासंदर्भात एबीपीशी बोलताना राजू शेट्टींनी आपल्या पक्षाच्या पुढील वाटचालीविषयी धोरण स्पष्ट केलं आहे.

राजू शेट्टी यांनी २०१९मध्ये महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला होता. राज्य सरकारने सभागृह नेता म्हणून उद्धव ठाकरेंची निवड करताना सूचक म्हणून राजू शेट्टींचं नाव घेतलं होतं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पाठिंबा काढल्यामुळे राज्य सरकारच्या स्थैर्याला फारसा धक्का लागणार नसला, तरी आघाडीतील एक मित्रपक्ष नाराज होऊन बाहेर पडला, तर जनमतावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवण्यात येत आहे.

minister chhagan bhujbal on lok sabha polls
“नाशिकमधून महायुतीतर्फे तुम्ही उभे राहा, असे मला सांगण्यात आले,” छगन भुजबळ यांची माहिती; म्हणाले, “आता उमेदवारीचा मुद्दा…”
PM Modi, Manipur, PM Narendra Modi,
मोदीजी म्हणतात, मणिपूरप्रश्नी वेळीच हस्तक्षेप केला… खरंच?
kirit somaiya
“…म्हणून काही तडजोडी केल्या”, किरीट सोमय्यांचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले, “आता मविआ सरकार असतं तर…”
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र

“पाठिंबा देणाऱ्या पक्षांशी संवाद नाही”

राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर संवाद साधत नसल्याचा गंभीर आरोप केला आहे. “या सरकारला अडीच वर्ष होत आली आहेत. महाविकास आघाडी सरकारचं समीक्षण करण्याची आता वेळ आली आहे. ज्या उद्देशाने किमान समान कार्यक्रमावर ही महाविकास आघाडी अस्तित्वात आली, त्या किमान समान कार्यक्रमाचं काय झालं?” असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.

“अनेक मुद्दे खटकणारे आहेत”

राज्य सरकारच्या धोरणामधले अनेक मुद्दे खटकणारे असल्याचं राजू शेट्टी म्हणाले आहेत. “स्वाभिमानी ही शेतकरी, शेतमजुरांमध्ये काम करणारी संघटना आहे. याबाबत महाविकास आघाडीच्या गेल्या अडीच वर्षातल्या धोरणाचं परीक्षण करायचं आहे. अनेक मुद्दे खटकणारे आहेत. अनेक मुद्द्यांबाबत फक्त किमान समान कार्यक्रम म्हटलं गेलं. पण एखादं नवीन धोरण राबवत असताना महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या पक्षांशी संवाद साधण्यात आला नाही”, अशा शब्दांत राजू शेट्टींनी नाराजी व्यक्त केली.

“शरद पवार साहेब, भाजपाची काळजी करू नका, तुम्ही पावसात भिजूनही…”, निवडणुकांवरून भाजपाचं खोचक प्रत्युत्तर!

“धोरणात्मक निर्णायातून बेदखल करत असाल तर…”

“आमच्या पाठिंबा देण्यामुळे किंवा न देण्यामुळे सरकारच्या स्थैर्यावर काही परिणाम होणार नाही हे त्यांनाही माहिती आहे. पण महाविकास आघाडीचा नेता निवडताना सूचक म्हणून माझं नाव त्यांना का घ्यावंसं वाटलं? कारण स्वाभिमानीनं अनेक वर्षांपासून जे नैतिक अधिष्ठान टिकवलं आहे, ते त्यांना सरकारसोबत हवं होतं. पण आज धोरणात्मक निर्णय घेताना तुम्ही आम्हाला बेदखल करत असाल, या सगळ्या गोष्टींसाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागत असेल आणि समोरून लोक म्हणत असतील की तुमचं सरकार असून तुम्हाला रस्त्यावर उतरावं का लागतंय? तर यावर आम्हाला चर्चा करणं आवश्यक वाटतंय”, असं राजू शेट्टी यावेळी म्हणाले.

फडणवीसांच्या २०२४ मध्ये पुन्हा येणार वक्तव्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “पोर्तुगीज आणि इंग्रजांनाही…”

५ एप्रिलला होणार निर्णय!

“मी एकटा हा निर्णय घेऊ शकत नाही. महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सामुदायिक निर्णय होता. येत्या ५ एप्रिलला राज्य कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. त्यात चर्चा केल्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल”, अशा शब्दांत राजू शेट्टींनी सूचक इशारा दिला आहे.