राज्यसभेच्या सहाव्या जागेवर छत्रपती संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून दावा सांगितला होता. मात्र शिवसेना व संजय राऊत यांनी ताठर भूमिका घेत त्यांना पाठिंबा देण्याचे नाकारून पक्षाचा उमेदवार उभा केला. संजय राऊत यांनी तर आमची ४२ मते आम्ही अपक्ष उमेदवाराला का देऊ? असा थेट सवाल करत पाठिंबा हवा असेल तर पक्षात प्रवेश करा, अशी अट संभाजीराजे यांना घातली होती. पण आज लागलेल्या निकालाने शिवसेना व संजय राऊत यांचा हा ४२ मतांचा फुगा फुटला आहे. जी मते सेनेकडे मुळात नव्हतीच, त्या मतांसाठी शिवसेना छत्रपती संभाजीराजे यांच्यावर अटी लादत होती हे आता निकालांनंतर स्पष्ट होऊ लागले आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी आज केलेले ट्वीट चर्चेचा विषय ठरले आहे.

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग संभाजीराजे यांनी ट्वीट करत आपल्या भावना मांडलेल्या आहेत…

kolhapur lok sabha marathi news, sanjay mandlik kolhapur marathi news
कोल्हापूरच्या आखाड्यात दत्तक प्रकरण तापणार ?
sanjay mandlik slams shahu maharaj
“शाहू महाराजांचा राजहट्ट…”, महायुतीचे उमेदवार संजय मंडलिकांचा टोला
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती
sambhajiraje chhatrapati latest marathi news, uddhav thackeray latest marathi news
शाहू महाराज – उद्धव ठाकरे भेटीवेळी संभाजीराजेंच्या अनुपस्थितीची चर्चा, राज्यसभा निवडणुकीतील घडामोडींमुळे नाराज

वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा । परि नाहीं दशा साच अंगीं ll
तुका म्हणे करीं लटिक्याचा सांठा । फजित तो खोटा शीघ्र होय ll

म्हणजेच, “वाघाचे पांघरून घेतल्यावर वाघासारखे दिसता येते, पण वाघासारखी दशा अंगी येत नाही. पण असा खोटा आव आणणाऱ्याची लगेचच फजिती होते”.

४२ मतांच्या संख्याबळाचा खोटा आव आणणाऱ्या शिवसेनेची आणि संजय राऊत यांची फजिती झाली, हेच संभाजीराजेंना यातून सुचवायचे असल्याचे आता बोलले जात आहे.