Ajit Pawar On Ram Shinde : विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडल्यानंतर सध्या नागपूरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अशात आज गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असलेलेल्या विधान परिषद सभापतीपदी भाजपाच्या राम शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. यानंतर सभापती राम शिंदे यांचे अभिनंदन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार टोलेबाजी केली. यासह अजित पवारांनी यावेळी केलेल्या विधानांमुळे विधान परिषद सभागृहात हशा पिकलेला पहायला मिळाला. यावेळी अजित पवार यांनी राम शिंदे विधानसभा निवडणुकीत हरल्यामुळेच त्यांना सभापती होण्याची संधी मिळाल्याचे म्हटले.

काय म्हणाले अजित पवार?

आज विधानसभा सभापतीपदी निवड झाल्यानंतर राम शिंदे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले. राम शिंदेंचे अभिनंदन करताना अजित पवार म्हणाले की, “सभापती महोदय तुमच्या मतदारसंघात मी सभा घेतली नाही म्हणून तुम्ही थोडासा राग व्यक्त केला. त्यामुळे विधानसभा निवडणूक हरल्याचेही आपण म्हणाला. पण, एका दृष्टीने ते योग्य झालं. जर विधानसभा निवडणुकीत निवडून आला असता देवेंद्रजींनी ठरवले असते तर मंत्रीही झाला असता. त्यामुळे गरीशला (महाजन) कदाचित थांबावे लागले असते. हे सर्व जाऊद्या, पण आज तुम्ही विधिमंडळात सर्वोच्च स्थानी आहात.”

Maharashtra Disaster Management Authority Mahayuti govt
महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात एकनाथ शिंदेंऐवजी अजित पवारांची निवड; महायुतीत नाराजी कायम?
pandit hridaynath Mangeshkar
हृदयनाथ मंगेशकर आकाशवाणीच्या नोकरीत खरंच होते का? कधी?
Chandrakant Patil demand to Deputy Chief Minister Eknath Shinde regarding the traffic congestion problem Pune news
अजित पवारांपाठोपाठ चंद्रकांतदादा भेटले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली ही मागणी !
Shiv Sena mouthpiece claims tension between Fadnavis and Shinde
एसटी महामंडळातील नियुक्तीवरून मुख्यमंत्र्यांची शिंदे गटावर कुरघोडी
Sanjay Shirsat On Shivsena
Sanjay Shirsat : एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, ‘संधी मिळाल्यास दोन्ही शिवसेना…’
Ravindr Dhangkar on Shiv sena :
Ravindr Dhangkar : माजी आमदार रविंद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार? स्पष्टीकरण देत म्हणाले, “मी काँग्रेस पक्षात…”
Ravindra Dhangekar met Deputy CM Eknath Shinde sparking rumors of joining Shinde group
मी वैयक्तिक कामासाठी एकनाथ शिंदेची भेट घेतली : माजी आमदार रविंद्र धंगेकर
Sanjay Shirsat On Thackeray Group
Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा दावा; म्हणाले, “अर्धे आमदार…”

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार सभापतींचे अभिनंदन करताना कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन मध्येच काहीतरी बोलले. त्यानंतर अजित पवारांनी महाजनांना टोला लगावत, “गिरीश आता तरी सुधर, कट होता होता वाचला आहे”, असे म्हटल्यानंतर संपूर्ण सभागृता हशा पिकला.

हे ही वाचा : “राम शिंदे सर, क्लास कसा चालवायचा हे…”, विधानपरिषद सभापतीपदी निवड होताच देवेंद्र फडणवीसांची टिप्पणी, सभागृहात हशा!

कोण आहेत राम शिंदे?

सध्या भाजपाकडून विधान परिषद आमदार आणि आता सभापती असलेले राम शिंदे २००९ मध्ये पहिल्यांदा नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर २०१४ मध्ये सलग दुसऱ्यांदा विजय मिळवल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान मिळाले होते. पुढे २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी त्यांचा पराभव केला होता. दरम्यानच्या काळात भाजपाने राम शिंदे यांना विधान परिषदेवर संधी दिली. त्यानंतर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही शिंदेंचा सुमारे १२०० मतांनी निसटता पराभव झाला होता.

Story img Loader