काँग्रेसची गाय-बछडा किंवा बैल-जोडी असुदे पक्ष फुटल्यानंतर निशाणी देताना निकष पाहिले तर एकनाथ शिंदेंना न्याय मिळेल. खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असल्याचं शिक्कामोर्तब होईल, असं वाटतं. कारण, एकूण आमदार आणि खासदाराला मिळालेली मते मोजली जातात. तसेच, एकनाथ शिंदेबरोबर १३ खासदार आणि ५० आमदार आहेत. उद्धव ठाकरेंबरोबर ५ खासदार आणि १४ आमदार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण मिळालं पाहिजे, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी व्यक्त केली आहे.

“बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे. जी काही अक्कल ती ठाकरेंनाच, आम्ही सगळे बेअक्कल आहोत. बाळासाहेब ठाकरे आमच्यासाठी देव आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला घडवलं, शून्यातन उभ केलं. शून्यातून बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना उभी केली. ‘मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी झगडणारी शिवसेना’ या घोषवाक्याने बाळासाहेब ठाकरेंनी पक्षाला स्थापन करत हिंदुत्वाच्या भूमिकेवर मोठं केलं. ती हिंदुत्ववादी शिवसेना उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि सोनिया गांधींबरोबर गहाण ठेवली,” अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे.

jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
in Relationships Your self-esteem is in your hands
नातेसंबंध : आपला आत्मसन्मान आपल्या हाती!
bjp keshav upadhyay article targeting sharad pawar uddhav thackeray and praskash ambedkar
संगीत खंजीर कल्लोळ…
FIR registered, Dhirendra Shastri Bageshwar Baba, mohadi police station, bhandara district, controversial statement
धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम बाबांना आक्षेपार्ह विधान भोवले, गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण….

हेही वाचा : “माझ्या मुलाचा अपघात घडवून त्याला…”, कशेडी घाटातील दरीचा उल्लेख करत रामदास कदमांचा मोठा गौप्यस्फोट

“उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली, अनेकजण”

“जयंत पाटील यांनी नागपूरमधील अधिवेशनात मान्य केलं, की शिवसेना ही राष्ट्रवादीची आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व, विचार संपवण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं. शरद पवारांकडे शिवसेना गहाण ठेवली. उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली. अनेकजण म्हणत आहे, आम्ही भाजपात प्रवेश करेल. पण, मरेपर्यंत भगवा झेंडा सोडणार नाही,” असेही रामदास कदमांनी सांगितलं.

हेही वाचा : “कोल्हापुरातील महालक्ष्मीच्या आशीर्वादाने हसन मियांचं…”, ED छापेमारीनंतर किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

“१४ तारखेला निकाल आल्यावर उद्धव ठाकरेंना समजेल…”

“संजय राऊत सकाळपासून रात्रीपर्यंत संघर्ष करत आहेत, त्यांची बाजू मांडत आहेत. ते जेवढं बोलत आहेत, तेवढा पक्ष कमी होत आहे. त्यामुळे त्यांना किती गांभीर्यांने घ्यायचं आपण ठरवायचं आहे. १४ तारखेला निकाल आल्यावर उद्धव ठाकरेंना समजेल, त्यांच्याजवळील अनिल परब त्यांना कसं फसवत आहेत,” असा आरोपही रामदास कदम यांनी केला आहे.