अमरावती : उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार शेख इरफान याने खासदार नवनीत राणा यांचा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रचार केल्याची बाब चर्चेत आली आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.

शेख इरफान याच्या समाज माध्यमावरील ‘पेज’वर नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यासोबतची छायाचित्रे समोर आल्याने वाद उफाळून आला आहे. खासदार नवनीत राणा या गेल्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार होत्या. त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता. यावेळी अल्पसंख्याक समुदायातील अनेक कार्यकर्ते त्यांच्यासोबत जुळले होते. या कार्यकर्त्यांनी रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षातर्फे प्रचारही केला होता. अमरावतीच्या कमेला ग्राउंड परिसरात राहणारा शेख इरफान हा ‘रहबर हेल्पलाईन’ ही स्वयंसेवी संस्था चालवतो. इरफान याने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी राणा यांचा प्रचार केला होता, असा आरोप केला जात आहे.

२०१९ ते २०२४ मोदींचा मराठवाड्यातील पट पूर्णपणे बदलला !
Prakash Awades rebellion cools down Chief Minister eknath shinde courtesy succeeds
प्रकाश आवाडेंचे बंड थंड, मुख्यमंत्र्यांची शिष्टाई सफल
ajit pawar and supriya sule
“संसदेत भाषणं करून मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाहीत”, अजित पवारांचे सुप्रिया सुळेंवर टीकास्र; म्हणाले, “माझी पट्टी लागली तर…”
ramdas kadam shrikant shinde
“…तर मी राजकारणातून निवृत्त होईन”, ठाकरे गटाच्या ‘त्या’ टीकेवर रामदास कदमांचं प्रत्युत्तर; श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबाबत म्हणाले…

‘विरोधकांचे खोटे आरोप’

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. शेख इरफानचा युवा स्वाभिमान पक्षाशी कोणताही संबंध नाही. विरोधकांनी आकसातून खोटे आरोप सुरू केले आहेत, असे रवी राणा यांचे म्हणणे आहे. उमेश कोल्हे यांची हत्या झाल्यानंतर यशोमती ठाकूर यांनी त्याविषयी अवाक्षरही काढलेले नाही. हे प्रकरण कोणाच्या दबावाखाली दडपले जात होते, हे समोर यायला हवे, असे नवनीत राणा यांचे म्हणणे आहे.