गेल्या दोन दिवसापासून ऊसाच्या फडात हालचालीविना स्तब्ध बसून असलेला गवा आढळून आला. वन विभागाने सोमवारपासून त्याच्यावर उपचार सुरु केले असून ठीक झाल्यानंतर त्याची रवानगी नैसर्गिक अधिवासात करण्यात येणार आहे. हेही वाचा- हृदयद्रावक ! दिव्यांग कल्याण निधीसाठीच्या आंदोलनात बहिणीपाठोपाठ दिव्यांग भावाचाही मृत्यू कामेरी (ता. वाळवा) गावी पाचवा टप्पा परिसरातील ऊसाच्या फडामध्ये शनिवारपासून रानगवा आढळून येत होता. स्थानिकांनी याची माहिती वन विभागाला दिली. उपवनसरंक्षक नीता कट्टे, सहायक उपवन संरक्षक अजित साजणे यांच्या मार्गदर्शनाखाली वन क्षेत्रपाल सचिन जाधव, मानद वन्य जीवरक्षक अजित पाटील यांनी वन कर्मचाऱ्यांच्या पथकासह गव्याच्या हालचालीचे निरीक्षण केले. कालपासून देखरेख सुरु ठेवली असता त्याची काहीच हालचाल होत नसल्याचे दिसून आले. बारकाईने पाहणी केली असता तो जखमी आल्याचे समजले. सोमवारी बचाव पथकाने जवळून पाहणी करुन वैद्यकीय उपचार सुरु केले आहेत. उपचारानंतर ठीक झाल्यावर त्याची नैसर्गिक अधिवासात पाठवणी करण्यात येणार आहे. हेही वाचा- धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून वाद सुरू ; माहीम निसर्ग उद्यानाचा समावेश करणार का ? दरम्यान, कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये दोन दिवस ठाण मांडून असलेल्या सांबराने वन विभागाने लावलेल्या आठ फूट उंचीच्या संरक्षक जाळीवरुन उडी मारुन पोबारा केला आहे. सांबर अजूनही आसपासच्या शिवारात असण्याची शक्यता असून कोणाला आढळल्यास वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.