Ranagava was found in sugarcane field in Valwa taluka sangli | Loksatta

सांगली: वाळवा तालुक्यात ऊसाच्या फडात आढळला जखमी रानगवा; उपचारानंतर नैसर्गिक आधिवासात सोडणार

रानगवा जखमी झाल्यामुळे तो ऊसाच्या फडात एकाच ठिकाणी बसून होता. बचाव पथकाने त्याच्यावर उपचार सुरु केले असून उपचारानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.

सांगली: वाळवा तालुक्यात ऊसाच्या फडात आढळला जखमी रानगवा; उपचारानंतर नैसर्गिक आधिवासात सोडणार
सांगलीतील वाळवा तालुक्यात ऊसाच्या फडात आढळला रानगवा

गेल्या दोन दिवसापासून ऊसाच्या फडात हालचालीविना स्तब्ध बसून असलेला गवा आढळून आला. वन विभागाने सोमवारपासून त्याच्यावर उपचार सुरु केले असून ठीक झाल्यानंतर त्याची रवानगी नैसर्गिक अधिवासात करण्यात येणार आहे.

हेही वाचा- हृदयद्रावक ! दिव्यांग कल्याण निधीसाठीच्या आंदोलनात बहिणीपाठोपाठ दिव्यांग भावाचाही मृत्यू

कामेरी (ता. वाळवा) गावी पाचवा टप्पा परिसरातील ऊसाच्या फडामध्ये शनिवारपासून रानगवा आढळून येत होता. स्थानिकांनी याची माहिती वन विभागाला दिली. उपवनसरंक्षक नीता कट्टे, सहायक उपवन संरक्षक अजित साजणे यांच्या मार्गदर्शनाखाली वन क्षेत्रपाल सचिन जाधव, मानद वन्य जीवरक्षक अजित पाटील यांनी वन कर्मचाऱ्यांच्या पथकासह गव्याच्या हालचालीचे निरीक्षण केले. कालपासून देखरेख सुरु ठेवली असता त्याची काहीच हालचाल होत नसल्याचे दिसून आले. बारकाईने पाहणी केली असता तो जखमी आल्याचे समजले. सोमवारी बचाव पथकाने जवळून पाहणी करुन वैद्यकीय उपचार सुरु केले आहेत. उपचारानंतर ठीक झाल्यावर त्याची नैसर्गिक अधिवासात पाठवणी करण्यात येणार आहे.

हेही वाचा- धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून वाद सुरू ; माहीम निसर्ग उद्यानाचा समावेश करणार का ?

दरम्यान, कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये दोन दिवस ठाण मांडून असलेल्या सांबराने वन विभागाने लावलेल्या आठ फूट उंचीच्या संरक्षक जाळीवरुन उडी मारुन पोबारा केला आहे. सांबर अजूनही आसपासच्या शिवारात असण्याची शक्यता असून कोणाला आढळल्यास वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 19:22 IST
Next Story
महाराष्ट्र तोडण्याचा हेतूपुरस्सर प्रयत्न होतोय; उद्धव ठाकरेंचा नाव न घेता भाजपावर हल्ला