scorecardresearch

Disha Salian Case : “शेवटी मी गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला आणि त्यानंतर… ; नऊ तासांच्या चौकशीनंतर बाहेर आल्यावर राणेंचं माध्यमांसमोर विधान!

”सुशांत आणि दिशाची हत्येनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मला दोनदा फोन आला होता, म्हणाले होते…”, असंही नारायण राणेंनी सांगितलं आहे.

(संग्रहित छायाचित्र)

दिशा सतीश सालियन मृत्यू प्रकरणात वादग्रस्त विधान केल्यामुळे दाखल झालेल्या गुन्ह्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे आमदार पुत्र नितेश राणे यांनी आज मालवणी पोलीस स्थानकामध्ये चौकशीसाठी हजेरी लावली. दुपारी १२ च्या सुमारास नारायण राणे आणि नितेश राणे चौकशीसाठी मालवणी पोलीस स्थानकामध्ये दाखल झाले होती. त्यानंतर जवळपास ९ तासांच्या चौकशी नंतर हे राणे पिता-पुत्र बाहेर आले. पोलीस स्टेशनमधून बाहेर आल्यानंतर नारायण राणे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

Disha Salian Case: स्वत: कार चालवत नितेश राणे वडिलांसहीत चौकशीसाठी पोलीस स्टेशनला पोहोचले; Tweet करत म्हणाले…

नारायण राणे यांनी सांगितलं की, “मला दोन दिवसांपूर्वी मालवणी पोलीस स्टेशनमधून एक नोटीस आली होती, 41 A ची नोटीस आली होती म्हणजे आपण आपलं म्हणणं सांगण्यासाठी पोलीस स्टेशनला यावं अशी ती नोटीस होती. त्यामध्ये असं म्हटलं होतं, की दिशा सालियनच्या आईने तक्रार केल्यामुळे तुम्हाला तुमचं म्हणणं सांगण्यासाठी बोलावलं आहे. दिशा सालियानबद्दल आम्ही जे काही, मी नितेशने पत्रकारपरिषदेत बोललो होतो, की तिचे खरे आरोपी पकडे पाहिजेत. तिने आत्महत्या केली नसून, ती हत्या आहे हे आम्ही वारंवार बोलत होतो. त्यामुळे दिशाच्या आईकडे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर गेल्या, त्यांना तक्रार करायला प्रवृत्त केलं आणि तक्रार दिली अशी की आम्ही दिशा सालियानला न्याय मिळावी ही मागण आमची असताना, आई म्हणते की राणे पिता-पुत्राने पत्रकारपरिषदेत मांडलेल्या मुद्यांमुळे माझी बदनामी होतेय. अशी खोट तक्रार पोलिसांना दिली. पोलीस स्टेशनने ती केस घेतली आणि आम्हाला बसवलं. मागील ९ तास आम्ही पोलीस स्टेशनमध्ये होतो.”

…पण याबाबत मात्र आम्ही शेवटपर्यंत जाणार –

तसेच, “मी सांगतोय वारंवार की मी केंद्रीयमंत्री आहे, नितेश राणे आमदार आहेत. आम्हाला अधिकार आहे कोणावर अन्याय होत असेल, दिशा सालियानवर अन्याय झाला. तिला न्याय मिळावा अशी आमची मागणी असातनाही आमच्यावर केस करण्यात आली. आम्ही अटकपूर्व जामीन घेतलेला आहे. पण याबाबत मात्र आम्ही शेवटपर्यंत जाणार. शेवटी मी गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला आणि त्यानंतर आम्हा दोघांनाही आमचे स्टेटमेंट पूर्ण झाल्यानंतर बाहेर सोडलेलं आहे.” अशी माहिती नारायण राणे यांनी दिली.

सुशांत आणि दिशाची हत्येनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मला दोनदा फोन आला –

याचबरोबर,“माझ्या जबाबत मी सगळी माहिती जी काही सुरुवातीपासून घडली, आम्ही जे बोलत होतो ते सांगितलं. एवढच नाही सुशांतची हत्या झाल्यानंतर दिशा सालियानची ८ आणि सुशांतची १३ जून रोजी हत्या झाल्यानंतर मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोनदा फोन आला, की आपण सुशांत आणि दिशाच्या केस बद्दल बोलू नका. एक मंत्र्याची गाडी होती असं बोलू नका. यावर मी म्हणालो की असं का बोलायचं नाही, आम्ही लोक प्रतिनिधी आहोत. नाही तुम्हाला देखील मुलं आहेत तुम्ही असं काही करू नका. मात्र हे वाक्य माझ्या जबाबातून वगळलेलं आहे. मी वारंवार सांगतोय की ते वाक्य टाका परंतु ते वगळलेलं आहे. याचाच अर्थ ही आजची केस राजकीय हेतून प्रेरित होऊन, मुद्दाम आमच्यावर दबाव टाकण्याच प्रयत्न करत आहेत. पण याचा आमच्यावर काही परिणाम होणार नाही. ” असंही राणेंनी बोलून दाखवलं.

आमचे पाच-दहा तास घेतले म्हणजे फार काय मिळवलं असं होत नाही –

तसेच, “जर कोणावरही अन्याय होणार असेल तर अन्यायाविरोधात आम्ही आवाज उठवणारच. पाच-दहा तास आमचे घेतले आयुष्याचे म्हणजे फार काय मिळवलं असं होत नाही. आम्ही दिशा सालियान आणि सुशांतच्या हत्येबद्दल जिथे संधी आहे तिथे आवाज उठवणार, दिशा सालियानची माझ्या माहितीप्रमाणे केस बंद करण्यात येत आहे. अन्यायचा अन्याय आणि ज्या लोकानी अत्याचार केला, त्यांना संरक्षण हे सरकार देतय, याच्याविरोधात आम्ही आवाज उठवत राहणार एवढं आजच्या प्रसंगी सांगतो.” असंही न नारायण राणे यांनी यावेळी बोलून दाखवलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rane father son out of malvani police station after nine hours of interrogation msr