संजय राऊतांची ‘त्या’ महिलेसोबतची ऑडिओ क्लिप लवकरच समोर आणणार; निलेश राणेंची धमकी

“राणे व त्यांची मुले मुख्यमंत्र्यांपासून इतर सर्व ज्येष्ठांचा उल्लेख एकेरीत व घाणेरड्या भाषेत करतात, हीच त्यांची संस्कृती,” असा टोला शिवसेनेनं लगावल्याने निलेश राणे संतापले.

Raut and Rane
ट्विटरवरुन दिला राऊतांना इशारा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मागील तीन दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या वक्तव्याप्रकरणी राणे यांना मंगळवारी दुपारी अटक करुन रात्री उशीरा जामीनावर सुटका करण्यात आली. मात्र त्यानंतरही दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. मागील दोन दिवसांपासून शिवसेनेने ‘सामना’मधून राणेंवर निशाणा साधला असतानाच आता राणेंचे पुत्र निलेश राणे यांनी ट्विटरवरुन याच लेखातील संदर्भ घेत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अडचणीत आणणार असल्याचं संकेत दिले आहेत.

नक्की वाचा >> रश्मी ठाकरेंविरोधात भाजपाची पोलिसांत तक्रार; गुन्हा दाखल करण्याची मागणी

शिवसेनेनं काय म्हटलं आहे?

“राणे व त्यांची मुले मुख्यमंत्र्यांपासून इतर सर्व ज्येष्ठांचा उल्लेख एकेरीत व घाणेरड्या भाषेत करतात, हीच त्यांची संस्कृती. माणसाने आपली लायकी दाखवायची ठरवली की, हे असे व्हायचेच,” असा उल्लेख आजच्या सामनाच्या अग्रलेखामध्ये करण्यात आलाय. यावरुन आता निलेश राणे यांनी संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत एक ट्विट करुन त्यांना ऑडिओ क्लिप जारी करण्याची धमकी दिलीय.

नक्की वाचा >> “फडणवीस व त्यांच्या पक्षाने गांजाच्या शेतात बागडायचे ठरवलेच असेल तर…”; शिवसेनेनं साधला निशाणा

निलेश राणेंनी दिला इशारा

संजय राऊतांमुळे त्रस्त असलेली पीडित माहिला काही कारणांमुळे न्यायालयामध्ये बाजू मांडू शकली नाही असं निलेश राणेंनी म्हटलं आहे. मात्र या प्रकरणामध्ये आपण राऊतांविरोधात आता वरिष्ठ न्यायालयामध्ये जाणार आहोत असंही निलेश यांनी सांगितलं आहे. तसेच त्या महिलेला न्याय मिळेपर्यंत संजय राऊत यांना आपण सोडणार नाही असा इशाराही निलेश राणेंनी दिलाय. “भाषेची वार्ता करतो तर जी भाषा एका महिलेशी बोलताना संजय राऊत यांनी वापरलीय ती ऑडिओ क्लिप लवकरच जाहीर करतो,” असंही निलेश राणे म्हणाले आहेत.

नक्की वाचा >> “एखाद्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानखाली मारेन असं म्हटलं तर..”; संजय राऊत संतापले

काय आहे प्रकरण

शिवसेना खासदार संजय राऊत आपली विविध प्रकारे छळवणूक करीत असल्याचा आणि पोलिसांत तक्रार करूनही काहीच कारवाई केली जात नसल्याचा आरोप करणारी याचिका एका ३६ वर्षीय महिलेने मार्च महिन्यामध्ये उच्च न्यायालयात केली होती. राऊत यांनी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी त्यांच्यावरील आरोपांचे खंडन केलं होतं. पेशाने मानसोपचारतज्ज्ञ असलेल्या या महिलेने काही व्यक्ती संजय राऊत आणि त्यांच्या पत्नीच्या सांगण्यावरून आपल्याला त्रास देत असल्याची तक्रार केली आहे. आभा सिंग यांनी या महिलेचं वकीलपत्र घेतलं असून उच्च न्यायालयात या महिलेची बाजू मांडत आहेत.

नक्की पाहा >> Video : मुख्यमंत्र्यांसारखीच चूक नितीन गडकरींनीही केली होती?

राऊतांनी कोर्टात काय बाजू मांडलेली?

‘ही महिला आपल्याला मुलीसारखी आहे. तिच्या कुटुंबाशी आपल्या कुटुंबाचे स्नेहाचे संबंध आहेत. पतीसोबत तिचा वाद सुरू आहे. या प्रकरणात आपण तिच्या पतीची बाजू घेत असल्याच्या समजातून ती आपल्यावर हे आरोप करत आहे,’ असा दावा राऊत यांच्यावतीने अ‍ॅड्. प्रसाद ढाकेफाळकर यांनी केला होता.  तर, मुलगी असणे आणि मुलीसारखे असणे यात फरक आहे, असे सांगत या महिलेने राऊत यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती.

नक्की वाचा >> ‘शिवसैनिकांना पडलेला प्रश्न’ म्हणत निलेश राणेंनी साधला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा

या महिलेने छळवणूक, पाळत ठेवणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे इत्यादी आरोपांप्रकरणी तीन वेळा तक्रार केली. तिने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तीन वेळा गुन्हा दाखल केला आहे. त्यातील पहिल्या गुन्ह्यात आरोपपत्र दाखल झाले आहे, दुसऱ्या प्रकरणात पोलिसांनी पुरावे नसल्याचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला. मात्र यातील एकाही गुन्ह्यात राऊत यांच्या नावाचा समावेश नाहीय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rane vs thackeray nilesh rane says will release the audio clip of sanjay raut scsg

Next Story
‘कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही’!
ताज्या बातम्या