सोलापूर : गेले दोन वर्षे करोना महामारीच्या संकटामुळे कोणतेही सणवार, उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करता येत नव्हते. यंदा करोनाचे संकट बऱ्यापैकी आटोक्यात आल्यामुळे सोलापुरात रंगपंचमी मोठय़ा उत्साहाने साजरा करण्यात आली. बालगोपाळांपासून तरुणाई आणि वृद्धांपर्यंत सर्वानी रंगांच्या उत्सवाचा आनंद लुटला.

करोना महामारीमुळे गेले दोन वर्षे निर्बंध होते. सुरुवातीला वर्षभर तर करोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत सर्वत्र हाहाकार उडाला होता. प्रत्येक जण हादरून गेला होता. सर्वत्र ताणतणाव होता. त्यातच करोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर निर्बंध लादले होते. त्यामुळे सलग दोन वर्षे कोणताही सण, उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा होत नव्हता. एरव्ही, सण, उत्सवातून मिळणारा आनंद करोनाने हिरावून घेतला होता. परंतु अलिकडे करोना महामारी आटोक्यात येऊन निर्बंधही शिथिल झाल्यानंतर पहिल्यांदाच रंग पंचमीचा आनंद लुटता आला. सोलापुरात होळीनंतर सर्वानाच रंगपंचमीचे वेध लागले होते. मंगळवारी सकाळी आठ वाजेपासूनच बच्चे कंपनी रंग खेळण्यासाठी घराबाहेर पडली होती. एकमेकांवर रंगांची उधळण करून घाईघाईने पळून जाणारी, गोंधळ करणारी मुले पाहून मोठय़ांचे चेहरेही आनंदाने ओसंडून वाहत होते. एकमेकांवर रंगांची मुक्त उधळण करताना तरुणाईचा उत्साह काही औरच होता.

ladu prasad
Ram Navami 2024 : १,११,१११ किलोचे लाडू अयोध्येला पाठवणार, राम नवमीसाठी देशभर भाविकांमध्ये उत्साह!
solapur, Extortion Case, Traders Forced to Pay, Ambedkar Jayanti Celebration, Traders Forced to Pay Ambedkar Jayanti, dr baba saheb ambedkar jayanti, police case,
सोलापूर : जयंती उत्सवाच्या वर्गणीच्या नावाने खंडणी मागितल्याने दोघांवर गुन्हा
Panvel, gudi padwa, woman power
पनवेलच्या शोभायात्रेत स्त्री शक्तीसोबत विविधतेमधून एकतेचा संदेश
Maldhok birds
अग्रलेख: पूतनामावशीचे पर्यावरणप्रेम!

प्रशासनाने रंग गाडय़ांच्या मिरवणुकांना तसेच ध्वनिक्षेपक यंत्रणांना परवानगी नाकारल्यामुळे अधिक आनंद लुटता आला नाही. तरुणांचे तांडे दुचाकी गाडय़ा उडवत मित्रांच्या घरांकडे आल्यानंतर रंगाची उधळण जल्लोषात होत होती. तरुणांच्या बरोबरच तरुणीही मैत्रिणींना रंगांमध्ये न्हाऊन काढण्यासाठी पुढे होत्या. शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर रंगलेल्या तरुणाईचा जल्लोष दिसत होता. गल्लीबोळातही असाच उत्साह पाहायला मिळाला.

एकीकडे गल्लीत, चौकात रंगांच्या उत्सवाचा आनंद लुटला जात असताना दुसरीकडे गडबड, गोंधळ, गोंगाटापासून दूर एखाद्या मित्र, नातेवाइकाच्या शेतघरावर जाऊन रंग पंचमी साजरी करण्याकडेही तरुणांचा कल दिसून आला. शेतात दिवसभर खाण्यापिण्यासह मौजमजा करून सायंकाळी उशिरा शहरात घराकडे परत येताना धुंदी न उतरलेल्या काही तरुणांना सांभाळण्याचे काम इतर मित्रांना करावे लागत होते.

रिमांड होममध्ये रंगपंचमी

शहरात पत्रकारनगराजवळील जिल्हा बाल अभिक्षणगृहात (रिमांड होम) मुला-मुलींनी रंग पंचमीचा अनोखा आनंद लुटला. नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. नवनीत तोष्णीवाल यांच्या पुढाकाराने अनाथ, निराधार मुला-मुलींना रंगपंचमीचे वेध दोन दिवसांपासून लागले होते. एकमेकांवर कोरडय़ा रंगांची उधळण करीत आनंदाची लयलूट केली जात होती.

पंढरपुरातही उत्साह

पंढरपूर – शहरात अनेक ठिकाणी रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. येथील यमाई तलाव येथे सुप्रभात मंडळाच्या वतीने रंगपंचमीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रांताधिकारी गजानान गुरव, उप विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशील बेल्हेकर, मुख्याधिकारी अरिवद माळी, येथील पत्रकार, व्यापारी, उद्योजक यांनी मिळून नैसर्गिक रंगाची उधळण करीत रंगपंचमी साजरी करण्यात आली.