धक्कादायक, विरारमध्ये पैशांचा पाऊस पाडण्याचा विधी करायचा सांगून ४ महिलांवर बलात्कार

पालघर जिल्ह्यातील विरार येथे २ आरोपींनी स्वतःला दैवी शक्ती मिळाल्याचा दावा करत पैशांचा पाऊस पाडण्यासाठी विधी करायचं सांगून ४ महिलांवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडलीय.

Student Gang Raped Boyfriend Thrashed By Robbers Near Mysore
(प्रातिनिधीक छायाचित्र)

पालघर जिल्ह्यातील विरार येथे २ आरोपींनी स्वतःला दैवीशक्ती मिळाल्याचा दावा करत पैशांचा पाऊस पाडण्यासाठी विधी करायचं सांगून ४ महिलांवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडलीय. या प्रकरणी अर्नाला कोस्टल पोलिसांनी एका २६ वर्षीय पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत २ आरोपींना अटक केलीय. मॅथ्यू पंडियान आणि दिनेश देवरुखकर अशी आरोपींची नावं आहेत.

आरोपींनी पीडित महिलांना त्यांच्याकडे दैवीशक्ती असल्याचा दावा केला. तसेच पैशांचा पाऊस पाडण्याचा विधी करायचा आहे. तो विधी केल्यास पैशांचा पाऊस पडेल आणि मग तुम्हाला २६० कोटी रुपये देऊ, असं आमिष दाखवलं. यानंतर पीडित महिलेने आणखी ३ महिलांशी संपर्क करून त्यांनाही या विधीसाठी तयार केलं. या विधीसाठी आरोपींनी या प्रत्येक महिलेकडून १०,००० रुपये पैसेही घेतले.

“विधी करण्याच्या नावाखाली ४ महिलांवर वारंवार बलात्कार”

यानंतर आरोपींनी या ४ महिलांवर विधी करायचे आहे या नावाखाली वारंवार बलात्कार केला. त्यानंतर या महिलांना दिलेल्या आश्वासना प्रमाणे त्यांना कोणतेही पैसे देण्यात आले नाही. हा संपूर्ण घटनाक्रम जुलै आणि ऑगस्ट २०२१ मध्ये घडला. अखेर या ४ पीडित महिलांपैकी एक महिला पुढे आली आणि तिने पोलीस तक्रार नोंदवली. यानंतर हा संपूर्ण प्रकार उघड झालाय.

हेही वाचा : “पुजाऱ्यानं आधी दारू आणायला सांगितली, मग खोलीत बंद करून मारत गाडीही पेटवली”

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी हिंदूस्थान टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार आरोपींविरुद्ध भारतीय दंडसंहिता कलम ३७६ (२) (बलात्कार) आणि महाराष्ट्र अघोरी कायदा२०१३ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आलाय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rape on 4 women in virar on the name of performing rituals for money rain pbs

Next Story
गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे
ताज्या बातम्या