अलिबाग  : सर्पमित्र अरिवद गुरव हे खोपोली शहरातील सायमाळ या ठिकाणी कॉलवर गेले असताना त्यांना पूर्ण वाढ झालेला खापर खवल्या जातीचा बिनविषारी साप आढळून आला. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भौगोलिक आणि जैविक संरचनेनुसार खापर खवल्या (शिल्ड टेल) जातीचा बिनविषारी साप हा थंड हवेच्या ठिकाणी आढळत असतो, मात्र खोपोलीसारख्या शहरांमध्ये तो आढळल्याने सर्पमित्रांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. अशा प्रजातीच्या सापाच्या अधिवासामुळे खोपोलीतील जैविक वैविध्य अजूनही शाबूत आहे याची सकारात्मक जाणीव होत असल्याचे सर्पमित्र आणि अभ्यासक अरिवद गुरव यांनी यावेळी सांगितले. खालापूर तालुक्याचे वन अधिकारी राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन कराडे आणि शीतल साळुंखे यांच्या उपस्थितीत अरिवद गुरव यांनी दिनेश ओसवाल, सुनील पुरी, सुशील गुप्ता, गुरुनाथ साठेलकर आणि शाहिद शेख यांच्या समवेत अभ्यासपूर्ण चर्चा करून खापर खवल्या जातीचा साप सुरक्षीत वनक्षेत्रात मुक्त केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rare snake found in khopoli area zws
First published on: 10-08-2022 at 05:44 IST