ताडोबात आढळला अतिदुर्मिळ ‘तणमोर’; पक्षी प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण

देशात केवळ २६४ तणमोर पक्षी शिल्लक आहेत.

Rare Tanmore found in Tadoba
तणमोर पक्षाच्या संरक्षण व संवर्धनासाठी ताडोबा व्यवस्थापन सरसावले आहे.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच अतिदुर्मिळ तणमोर पक्षी आढळला आहे. तणमोर पक्षी मादी असून तणमोरच्या नोंदीने ताडोबाच्या पक्षी वैभवात मोठी भर पडली आहे. विशेष म्हणजे, तणमोर पक्षी अतिदुर्मिळ असून देशात केवळ २६४ पक्षी शिल्लक आहेत. ताडोबात तणमोर आढळल्याने पक्षी व वन्यजीवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व्याघ्रदर्शनासाठी जगप्रसिध्द असून येथे वन्यप्राणी व पक्षी मोठ्या संख्येने दिसून येतात. त्यामुळे ताडोबाने सर्वांना भुरळ घातली आहे. ताडोबा व्यवस्थापनाकडून प्राणी व पक्ष्यांच्या हालचालीसाठी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते. या कॅमेऱ्यांमध्ये पहिल्यांदाच अतिदुर्मिळ असणारा तणमोर पक्षी कैद झाला आहे.

प्रजनन काळातील पक्ष्यांच्या विशेष उडीसाठी तणमोर पक्षी ओळखला जातो. तणमोर पक्षाला पोषक वातावरण मिळत नसल्यामुळे पक्षांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. देशात केवळ २६४ तणमोर पक्षी शिल्लक आहे. त्यामुळे ताडोबात आढळलेल्या मादी तणमोर पक्षाच्या संरक्षण व संवर्धनासाठी ताडोबा व्यवस्थापन सरसावले असून, तणमोरसाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्प वरदान ठरणार आहे. तणमोर आढळल्याने पक्षी व वन्यजीवप्रेमींमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rare tanmore found in tadoba an atmosphere of joy among bird lovers msr

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या