अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर जिल्ह्यातील या योजनेचा लाभ अपात्र व्यक्तींना मिळत असल्याच्या तक्रारी झाल्याने संपूर्ण जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांची तपासणी करण्याची मोहीम पुरवठा विभागाने हाती घेतली आहे. उद्यापासून ही मोहीम राबविली जाणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी सांगितले.
सांगली जिल्ह्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा विधेयक २०१३ ची अंमलबजावणी १ फेब्रुवारी २०१४ पासून करण्यात आली आहे.  त्याचे निकष खालीलप्रमाणे आहेत.
ग्रामीण भाग – उत्पन्न मर्यादा १५००१ ते ४४०००, लाभार्थी निवड टक्केवारी ७६.३२, प्राधान्य गटातील कार्यरत लोकसंख्या १४२४२२८, अंत्योदय गटातील कार्यरत लाभार्थी (कार्डसंख्या) २१९७०, उर्वरित एपीएल शिधापत्रिकाधारक ५९८१९.  शहरी भाग – उत्पन्न मर्यादा १५००१ ते ५९०००, लाभार्थी निवड टक्केवारी ४५.३४, प्राधान्य गटातील कार्यरत लोकसंख्या २७८५८३, अंत्योदय गटातील कार्यरत लाभार्थी (कार्डसंख्या) १३८४५, उर्वरित एपीएल शिधापत्रिकाधारक ८६५१० अशी एकूण प्राधान्य गटातील कार्यरत लोकसंख्या १७०२८११, अंत्योदय गटातील कार्यरत लाभार्थी (कार्डसंख्या) ३५८१५ व उर्वरित एपीएल शिधापत्रिकाधारक १४६३२९ आहेत.
शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडील ९ जानेवारी २०१४ च्या पत्रान्वये प्राप्त निर्देशनानुसार लाभार्थी याद्या प्रसिद्ध करण्याकामी तालुक्यांना पुढीलप्रमाणे निधी वितरित करून जिल्ह्यातील सर्व रास्त भाव दुकानामध्ये लाभार्थी याद्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत.  तालुकानिहाय कार्यरत रास्त भाव दुकाने व कंसातील अंक वितरित करण्यात आलेला  निधी दíशवतात. सांगली -२१४ (४२८०००), मिरज -१३२ (२६४०००), जत -१७५ (३५००००), कवठेमहांकाळ – ८५ (१७००००), आटपाडी – ८७ (१७४०००), तासगाव -९५ (१९००००), खानापूर – ११० (२२००००), कडेगाव – ८१  (१६२०००), पलूस – ५० (१०००००), वाळवा – १७४ (३४८०००), शिराळा – ११० (२२००००). असा एकूण १ हजार ३१३ कार्यरत रास्त भाव दुकानासाठी २६ लाख २६ हजार निधी वितरित करण्यात आला आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा विधेयक २०१३ अंतर्गत लाभार्थी गटांना मिळणारे धान्य, दर, प्रमाण पुढीलप्रमाणे. अंत्योदय (प्रतिकार्ड) – गहू २  रुपये प्रतिकिलो प्रमाणे २० किलो, तांदूळ ३ रुपये प्रतिकिलो प्रमाणे १५ किलो तर साखर १३ रुपये ५० पसे प्रतिकिलो प्रमाणे उपलब्ध झाल्यानंतर माणसी ५०० ग्रॅम आहे. प्राधान्य कुटुंब लाभार्थी (प्रति लाभार्थी) – गहू २ रुपये प्रतिकिलो प्रमाणे ३ किलो तर तांदूळ ३ रुपये प्रतिकिलो प्रमाणे २ किलो. उर्वरित एपीएल (केशरी शिधापत्रिकाधारक) – गहू ७ रुपये २० पसे प्रतिकिलो प्रमाणे १०  किलो तर तांदूळ ९ रुपये ६० पसे प्रतिकिलो प्रमाणे ५ किलो असे आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा विधेयक २०१३ ची अंमलबजावणी जिल्ह्यामध्ये सुरू झाल्यानंतर लाभार्थी निवडीच्या अनुषंगाने अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत.  त्यामुळे जिल्ह्यातील कार्यरत सर्व रास्त भाव दुकानांची १०० टक्के तपासणी १२ जून ते २७ जून २०१४ या कालावधीत पुरवठा निरीक्षक व पुरवठा अव्वल कारकून यांच्यामार्फत होणार आहे.  या पुरवठा निरीक्षक व अव्वल कारकून यांनी केलेल्या रास्त भाव दुकानाची उलट तपासणी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व इतर अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने संबंधितांना लेखी स्वरूपात सूचना देण्यात आलेल्या आहेत.
धान्य वाटपातील गळती व काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यातील 3 रास्त भाव दुकानांमध्ये बायोमॅट्रीक पद्धतीने रेशिनगचे वाटप यशस्वीरीत्या सुरू आहे.  सद्यस्थितीत जिल्ह्य़ातील काही तालुक्यांमध्ये रास्त भाव दुकानांमध्ये बायोमेट्रीक पद्धतीने रेशिनगचे वाटप करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील सर्व रास्त भाव दुकानाची तपासणी १२ जून ते २७ जून २०१४ या कालावधीत पुरवठा निरीक्षक व पुरवठा अव्वल कारकून यांचेमार्फत १०० टक्के रास्त भाव दुकानाची तपासणी होणार आहे. तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी जर आपल्या रास्त भाव दुकानात वेळेवर धान्य मिळते अगर कसे? प्रचलित दराने धान्य मिळते अगर कसे? यासारख्या तक्रारी असतील तर संबंधित तहसील कार्यालय, अन्नधान्य वितरण कार्यालय सांगली व पुरवठा शाखा सांगली या ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी केले आहे.