रत्नागिरी: मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेनंतर धास्तावलेल्या रत्नागिरी नगर परिषदेकडून खबरदारी म्हणून रत्नागिरी शहरातील सर्वच पुतळ्याची रेडिओग्राफी करण्यात आली. मात्र या रेडिओग्राफीचा अहवाल आल्यावरच संबंधीत पुतळ्यांची डागडूजी करण्याचे काम नगर परिषद प्रशासनाकडून हाती घेण्यात येणार आहे.

रत्नागिरी नगर परिषदे कडून शहरातील पुतळ्यांची रेडिओग्राफी नुकतीच पूर्ण करण्यात आली आहे. या पुतळ्यांची रेडिओग्राफी पुर्ण झाल्यावर कोल्हापुरातील प्रयोगशाळेतून या रेडिओग्राफीचा अहवाल प्राप्त होणार आहे. त्यानंतरच यापुतळ्यांबाबत पुढिल उपाययोजना केल्या जाणार आहेत. असे रत्नागिरी नगर परिषदेच्या बांधकाम विभागाचे अभियंता यतिराज जाधव यांनी सांगितले.

Changes in traffic on national and state highways on occasion of Jijau Jayanti
जिजाऊ जयंतीनिमित्त ‘या’ राष्ट्रीय, राज्य महामार्गावरील वाहतुकीत बदल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Gold and silver ornaments worth 15 lakhs on idol of goddess were robbed
देवीच्या मूर्तीवरील १५ लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास
Suvarnadurga Fort marathi news
दापोली येथील सुवर्णदुर्ग किल्ल्याला मिळणार ‘वर्ल्ड हेरीटेज’चा दर्जा; जिल्हा प्रशासनाकडून पाहणी
gold jewelry scam with housewife in kurla
बनावट दागिन्यांच्या बदल्यात खरे दागिने घेऊन महिला पसार
Tirupati Stampede Latest Updates| Stampede at Tirupati bairagipatteda token counter
Tirupati Stampede: तिरुपती बालाजी मंदिरात चेंगराचेंगरी का झाली? त्यावेळी नेमकं काय घडलं? कारण आलं समोर!
Foreign varieties on the root of Shrivardhan Rotha betel nut
परराज्यातील वाण श्रीवर्धनच्या रोठा सुपारीच्या मुळावर?
The luck of these zodiac signs will shine on January 28th
२८ जानेवारीला चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब, शुक्र ग्रह निर्माण करणार मालव्य राजयोग!

हेही वाचा >>>Madhukar Pichad : भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन; ८४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मालवण येथील पुतळा दुर्घटने नंतर रत्नागिरी मधील पुतळ्यांची देखभालीसाठी सर्व पुतळ्यांची रेडिओग्राफी करण्याचा निर्णय रत्नागिरी नगर परिषदेने घेतला होता. शहरातील सर्व पुतळ्यांची २ डिसेंबरपासून रेडिओग्राफी सुरू करण्यात आली होती. रेडिओग्राफीमध्ये पुतळ्यांची झीज, तडे गेल्याचे दिसून येते. नगर परिषदे मार्फत करण्यात आलेल्या रेडिओग्राफीमध्ये शहरातील छत्रपती संभाजी महाराज, स्वा. वि. दा. सावरकर, विठ्ठलाची मूर्ती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज,  आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताच्या शिल्पाची रेडिओग्राफी पूर्ण करण्यात आली असल्याचे अभियंता यतिराज जाधव यांनी सांगितले. रत्नागिरी शहरातील प्रमुख पुतळ्यांची रेडिओग्राफी  पुर्ण झाली आहे. या रेडिओग्राफीसाठी रत्नागिरी शहर परिसर पुतळे असलेल्या रस्त्यांवरील वाहतुक बंद करण्यात आली होती.

Story img Loader