रत्नागिरी : शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यातील पंचायत समितींच्या सभापती व उपसभापती पदांसाठी नावे जाहीर करण्यात आली आहेत.
या निवड प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून ही घोषणा करण्यात आली असून, प्रथमच निवडून आलेल्या सदस्यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पक्ष आदेशानुसार ही सभापती व उपसभापती पदे सव्वा वर्षांच्या कालावधीसाठी राहणार आहेत.
तालुकानिहाय संभाव्य पदाधिकारी पुढीलप्रमाणे :
मंडणगड पंचायत समिती
- सभापती – सौ. प्रणाली संदेश चिले
- उपसभापती – श्री. दिपक शंकर मालुसरे
खेड पंचायत समिती - सभापती – सौ. आफिया नजीब पालेकर
- उपसभापती – श्री. सुनिल बाबाराम मोरे
दापोली पंचायत समिती - सभापती – श्री. उन्मेष रामचंद्र राजे
- उपसभापती – सौ. नम्रता प्रदीप तोडणकर
चिपळूण पंचायत समिती - सभापती – श्री. संदेश मनोहर आयरे
गुहागर पंचायत समिती - सभापती – श्री. प्रणव प्रमोद पोळेकर
देवरुख पंचायत समिती - सभापती – सौ. शर्वरी प्रथमेश वेल्ये
रत्नागिरी पंचायत समिती - सभापती – श्री. प्रविण धोंडू पांचाळ
- उपसभापती – श्री. गजानन धर्माजी धनावडे
राजापूर पंचायत समिती - सभापती – सौ. नंदिनी नितिन कदम
- उपसभापती – श्री. अभिजित यशवंत गुरव
लांजा पंचायत समिती - सभापती – सौ. मानसी सिद्धेश्वर आंबेकर
- उपसभापती – श्री. आदेश दत्तात्रय आंबोळकर
या घोषणेमुळे जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात हालचाल निर्माण झाली असून लवकरच होणाऱ्या पंचायत समितीच्या बैठकीत या नावांवर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
