Ratnagiri ZP Election Results LIVE Updates (रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूक निकाल): महाराष्ट्रातील यंदाच्या निवडणूक हंगामातील शेवटची निवडणूक जिल्हा परिषदेची ठरली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनुसार राज्य निवडणूक आयोगाने आधी नगरपरिषद-नगरपंचायत, त्यानंतर महानगरपालिका आणि सरतेशेवटी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. विशेष म्हणजे आधी झालेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये राज्यातील आघाड्या व युतींच्या अगदी उलट चित्र अनेक ठिकाणी दिसलं. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद निवडणुकांमध्येदेखील अनेक ठिकाणी राज्यातील मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिल्याचं दिसून आलं. रत्नागिरी जिल्हा परिषदेची निवडणूक त्यासाठी अपवाद नव्हती!
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्रातील ३४ जिल्हा परिषदांपैकी फक्त १२ जिल्हा परिषदा व एकूण १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका यंदा घेतल्या जात आहेत. या निवडणुकांसाठी एकीकडे राज्यात सत्तेत असणाऱ्या महायुतीमधील भाजपा, एकनाथ शिंदेंची शिवसेना व अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष कुठे एकमेकांसोबत तर कुठे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याचं दिसून आलं. दुसरीकडे विरोधकांचीदेखील काहीशी अशीच स्थिती पाहायला मिळाली.
रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक २०२६ वेळापत्रक (Ratnagiri ZP Election Schedule 2026)
महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी १२ जिल्हा परिषदांसाठी यंदा निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. त्याअंतर्गत रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूक २०२६ साठी मतदानाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीच्या वेळापत्रकानुसार ही निवडणूक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार होती. मात्र, राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यभरात शोककळा पसरली. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने परिस्थितीचा आढावा घेत निवडणूक प्रक्रियेच्या वेळापत्रकात आवश्यक बदल केले.
त्यानुसार, रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत पार पडले असून, मतमोजणी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या भावनिक वातावरणात पार पडलेल्या या निवडणुकीकडे राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
| निवडणूक टप्पा | तारीख / वेळ |
|---|---|
| सूचना प्रसिद्धी | १६ जानेवारी |
| नामनिर्देशन स्वीकारणे | १६ जानेवारी ते २१ जानेवारी |
| छाननी | २२ जानेवारी २०२६ |
| माघारीची अंतिम मुदत | २७ जानेवारी, दुपारी ३:०० पर्यंत |
| अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप | २७ जानेवारी, दुपारी ३:३० नंतर |
| मतदान | ७ फेब्रुवारी, सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३० पर्यंत |
| मतमोजणी | ९ फेब्रुवारी, सकाळी १०:०० पासून |
रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती वॉर्ड संख्या (Ratnagiri Zila Parishad and Panchayat Samiti Wards Count)
रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेचे ५६ निवडणूक विभाग आणि ९ पंचायत समित्या आहेत. या जिल्हा परिषदेच्या क्षेत्रात एकूण ११२ पंचायत समिती वॉर्ड आहेत.
| माहिती | संख्या |
|---|---|
| जिल्हा परिषद एकूण वॉर्ड | ५६ |
| पंचायत समिती (सीट संख्या) | ९ |
| पंचायत समिती एकूण वॉर्ड | ११२ |
Ratnagiri Zila Parishad Election Result 2017 – Party-wise Seats रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०१७- पक्षनिहाय जागा
२०१७ साली या जिल्हा परिषदेच्या घेण्यात आलेल्या निवडणुकीत शिवसेना पक्ष ३९ जागांसह प्रथम क्रमांकावर होता. त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर १६ जागांसह राष्ट्रवादी पक्षाची कामगिरी राहिली.
रत्नागिरी जिल्हा परिषदेचा विचार केला असता मागील म्हणजेच २०१७ साली झालेल्या निवडणुकीत शिवसेना (SHS) पक्षाला विजय मिळाला होता. निवडणुकीनंतर स्नेहा सावंत यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. तर उपाध्यक्ष पदी शिवसेना (SHS)चे विजय खेराडे यांनी बाजी मारली होती.
| पक्षाचे नाव | जिंकलेल्या जागा |
|---|---|
| शिवसेना | ३९ |
| राष्ट्रवादी | १६ |
| एकूण | ५५ |
रत्नागिरी जिल्हा परिषद वॉर्ड निहाय निकाल २०१७ (Ratnagiri Zilla Parishad Ward Wise Results 2017)
रत्नागिरी जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये एकूण ५६ निवडणूक विभाग असून २०१७ साली तेव्हाच्या राजकीय स्थितीचं प्रतिबिंब या जिल्ह्याच्या निकालांमध्ये पाहायला मिळालं.
| वॉर्ड क्रमांक | विजेत्याचे नाव | विजेत्या पक्षाचे नाव |
|---|---|---|
| ५० | गोपाळ परशुराम आडिवरेकर | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ५ | मोहन पांडुरंग मुळे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| १ | प्रमोद बाळाराम जाधव | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| २ | संतोष सोनू गोवले | शिवसेना (SHS) |
| ३ | रेश्मा रमेश झगडे | शिवसेना (SHS) |
| ४ | नेहा युवराज जाधव | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ६ | चारुता चंद्रकांत कामतेकर | शिवसेना (SHS) |
| ७ | अनंत सखाराम करबेले | शिवसेना (SHS) |
| ८ | सुनील लक्ष्मण तोडणकर | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| ९ | सिद्धी सचिन पवार | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| १० | स्वप्नाली रोहन पाटणे | शिवसेना (SHS) |
| ११ | अरुण गंगाराम कदम | शिवसेना (SHS) |
| १२ | हशमत पारकर नफीसा | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| १३ | सुनील बाबाराम मोरे | शिवसेना (SHS) |
| १४ | अरविंद लक्ष्मण चव्हाण | शिवसेना (SHS) |
| १५ | राजेंद्र दत्ताराम आंब्रे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| १६ | मीनल मुकुंद काणेकर | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| १७ | दिप्ती दीपक महाडिक | शिवसेना (SHS) |
| १८ | दिशा दशरथ दाभोलकर | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| १९ | विनोद प्रकाश झगडे | शिवसेना (SHS) |
| २० | सुचिता चंद्रकांत सुवार | शिवसेना (SHS) |
| २१ | बाळकृष्ण श्रीराम जाधव | शिवसेना (SHS) |
| २२ | ऋतुजा रूपेश खांडेकर | शिवसेना (SHS) |
| २३ | निकिता राजेश सुर्वे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| २४ | पूनम संतोष चव्हाण | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| २५ | विक्रांत भास्कर जाधव | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| २६ | प्रवीण विलास ओक | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| २७ | नेत्रा नवनीत ठाकूर | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) |
| २८ | महेश रघु नाटेकर | शिवसेना (SHS) |
| २९ | ऋतुजा राजेश जाधव | शिवसेना (SHS) |
| ३० | उदय विनायक बने | शिवसेना (SHS) |
| ३१ | साधना राजेश साळवी | शिवसेना (SHS) |
| ३२ | स्नेहा सुकांत सावंत | शिवसेना (SHS) |
| ३३ | महेश शांताराम म्हाप | शिवसेना (SHS) |
| ३४ | परशुराम मारुती कदम | शिवसेना (SHS) |
| ३५ | प्रकाश धोंडू रसाळ | शिवसेना (SHS) |
| ३६ | देवयानी महेंद्र झपडेकर | शिवसेना (SHS) |
| ३७ | मानसी मंगेश साळवी | शिवसेना (SHS) |
| ३८ | आरती रविकिरण तोडणकर | शिवसेना (SHS) |
| ३९ | सहदेव देवजी बेटकर | शिवसेना (SHS) |
| ४० | संतोष भागोजी थेराडे | शिवसेना (SHS) |
| ४१ | रचना राजेंद्र महाडिक | शिवसेना (SHS) |
| ४२ | माधवी मनोहर गिते | शिवसेना (SHS) |
| ४३ | रोहन सुभाष बने | शिवसेना (SHS) |
| ४४ | मुग्धा जनक जागुष्टे | शिवसेना (SHS) |
| ४५ | रजनी राजेंद्र चिंगाळे | शिवसेना (SHS) |
| ४६ | चंद्रकांत सोमा मंचेकर | शिवसेना (SHS) |
| ४७ | पूजा सुरेशभाई नाव | शिवसेना (SHS) |
| ४८ | पूजा आदेश आंबोळकर | शिवसेना (SHS) |
| ४९ | स्वरूपा संतोष साळवी | शिवसेना (SHS) |
| ५१ | निशिगंधा भास्कर सुतार | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) |
| ५२ | भारती रामचंद्र सरवणकर | शिवसेना (SHS) |
| ५३ | सोनम संतोष बावकर | शिवसेना (SHS) |
| ५४ | दीपक तुकाराम नागळे | शिवसेना (SHS) |
| ५५ | लक्ष्मी लीलाधर शिवलकर | शिवसेना (SHS) |
रत्नागिरी जिल्हा परिषद वॉर्ड निहाय निकाल २०२६ (Ratnagiri ZP Ward Wise Election Results 2026)
रत्नागिरी जिल्हा परिषदेअंतर्गत एकूण ५६ जिल्हा परिषद प्रभाग आहेत. तसेच जिल्ह्यातील ९ पंचायत समित्यांमध्ये एकूण ११२ प्रभागांचा समावेश आहे. २०११ च्या जनगणनेनुसार रत्नागिरी जिल्ह्याची एकूण लोकसंख्या १,६१५,०६९ इतकी आहे. २०२६ साली झालेल्या या निवडणुकांमधील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभागांचे सविस्तर निकाल येथे पाहता येतील.
महाराष्ट्रातील महत्वाचे जिल्हा परिषद निवडणुका निकाल २०२६ लाईव्ह अपडेट (Maharashtra Zilla Parishad Election Results 2026)
रत्नागिरी जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांची नावे
| क्रमांक | पंचायत समित्यांची नावे |
|---|---|
| १ | मंडणगड पंचायत समिती |
| २ | दापोली पंचायत समिती |
| ३ | खेड पंचायत समिती |
| ४ | चिपळूण पंचायत समिती |
| ५ | गुहागर पंचायत समिती |
| ६ | रत्नागिरी पंचायत समिती |
| ७ | संगमेश्वर पंचायत समिती |
| ८ | लांजा पंचायत समिती |
| ९ | राजापूर पंचायत समिती |
महाराष्ट्र जिल्हा परिषद २०२६ निवडणुकीशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न-उत्तरे
प्र. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निवडणुका कधी झाल्या?
उ. ७ फेब्रुवारी २०२६, सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३० या वेळेत मतदान पार पडले.
प्र. रत्नागिरी जिल्हा परिषदेचे निकाल कधी जाहीर करण्यात आले?
उ. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात आले.
प्र. रत्नागिरी जिल्हा परिषदेची रचना कशी आहे? जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर किती निवडणूक विभाग आहेत?
उ. रत्नागिरी जिल्हा परिषदेत एकूण ५६ जिल्हा परिषद निवडणूक विभाग आहेत. जिल्ह्यात ९ पंचायत समित्या कार्यरत आहेत. या पंचायत समित्यांच्या कार्यक्षेत्रात एकूण ११२ पंचायत समिती निवडणूक विभाग समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे, पंचायत समितीच्या निवडणूक विभागांची संख्या जिल्हा परिषद निवडणूक विभागांच्या तुलनेत दुप्पट असते.
प्र. महापौरांची निवड कशी केली जाते?
उ. महापौरांची निवड निवडून आलेल्या नगरसेवकांमधून होते. बहुमत असणाऱ्या पक्षाचे उमेदवार महापौर व उपमहापौर होतात.
प्र. महाराष्ट्रात किती जिल्हा परिषदा आहेत?
उ. महाराष्ट्रात ३६ जिल्ह्यांमध्ये मिळून ३४ जिल्हा परिषदा आहेत.
प्र. महानगरपालिका निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी कोण पात्र असतं?
उ. वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे भारतीय नागरीक मतदानासाठी पात्र असतात.
प्र. जिल्हा परिषदेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो?
उ. जिल्हा परिषदेचा कार्यकाळ ५ वर्षांचा असतो.
जिल्हा परिषद निवडणूक कार्यक्रम कोण जाहीर करतं?
उ. जिल्हा परिषद कार्यक्रम राज्य निवडणूक आयोग जाहीर करतं.
प्र. महाराष्ट्रात जिल्हा परिषद निवडणूक किती वेळा होतात?
उ. जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही दर पाच वर्षांनी होतात.
प्र. जिल्हा परिषद निवडणुकीत कोणी मतदान करू शकतो?
उ. जिल्ह्यातील त्या प्रभागात नोंदणीकृत मतदार म्हणून नोंदणीकृत रहिवासी मतदानासाठी पात्र आहेत.
प्र. जिल्हा परिषद सदस्याची जबाबदारी काय आहे?
उ. जिल्हा परिषद सदस्य स्थानिक विकास प्रकल्प, कल्याणकारी योजना तसेच जिल्ह्यातील शाळा, रुग्णालये आणि ग्रामीण पायाभूत सुविधा यांचे प्रशासन आणि निर्णय घेण्याची जबाबदारी पार पाडतात.
प्र. जिल्हा परिषद अध्यक्षाची निवड कशी होते?
उ. वार्ड सदस्य निवडून आल्यावर, ते आपापसांत मतदान करून जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड करतात.
प्र. जिल्हा परिषद निवडणुका कोण घेते?
उ. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक संस्थांसाठी स्वच्छ आणि स्वतंत्र निवडणुका घेण्यास जबाबदार आहे.
प्र. पंचायत समित्यांची सदस्य संख्या किती असते?
उ. महाराष्ट्रात पंचायत समित्यांची सदस्य संख्या त्या समितीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांच्या संख्येच्या दुप्पट असते.
प्र. जिल्हा परिषद सदस्यांची संख्या किमान व कमाल किती असू शकते?
उ. कोणत्याही जिल्हा परिषद सदस्यांची संख्या किमान ५० ते कमाल ७५ असू शकते.
प्र. मतदारांना रत्नागिरी जिल्हा परिषदेचा निकाल कुठे पाहाता येईल?
उ. मतदारांना रत्नागिरी जिल्हा परिषदेचा निकाल निवडणूक आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ व लोकसत्ता डॉट कॉमसारख्या विश्वासार्ह संकेतस्थळांवर पाहाता येईल.
डिस्क्लेमर: या पृष्ठावर नमूद करण्यात आलेली महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुकांसाठी निवडणूकविषयक माहिती विविध सार्वजनिक स्रोत, राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकृत अधिसूचना, माध्यमांतील अहवाल तसेच उपलब्ध आकडेवारीच्या आधारे संकलित करण्यात आली आहे. माहिती अचूक आणि अद्ययावत ठेवण्यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात आली असली, तरी कालांतराने आकडे, निकाल किंवा इतर तपशीलांमध्ये बदल होण्याची शक्यता राहते. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी वाचकांनी संबंधित अधिकृत स्रोतांची पडताळणी करणे आवश्यक आहे. या माहितीच्या आधारे घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही निर्णयासाठी संकेतस्थळ किंवा प्रकाशक जबाबदार राहणार नाही.
