रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. मतदारांचा संमिश्र प्रतिसाद लाभलेल्या या मतदानात जिल्ह्याचा सरासरी मतदानाचा टक्का ५५.७९ इतका नोंदवण्यात आला आहे. प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, यंदा महिला मतदारांनी पुरुषांच्या तुलनेत अधिक उत्साह दाखवला.

जिल्ह्यात सर्वाधिक मतदान चिपळूण तालुक्यात झाले असून, तेथे ६२.५६ टक्के मतदानाची नोंद झाली. त्याखालोखाल रत्नागिरी तालुक्यात ५८.५२ टक्के, तर खेड तालुक्यात ५६.८९ टक्के मतदान झाले. गुहागर (५६.५२ टक्के) आणि दापोली (५३.८७ टक्के) या किनारपट्टी तालुक्यांमध्येही समाधानकारक मतदान झाले.

दक्षिण रत्नागिरीत लांजा तालुक्यात ५१.१६ टक्के, तर राजापूर तालुक्यात ४९.८७ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात सर्वात कमी मतदान मंडणगड तालुक्यात नोंदवले गेले असून, तेथे केवळ ४८.७९ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील एकूण ६ लाख ५४ हजार ९४९ मतदारांपैकी ३ लाख ३६ हजार २८५ महिला मतदारांनी मतदान केले, तर ३ लाख १८ हजार ६६२ पुरुष मतदारांनी सहभाग नोंदवला. ‘इतर’ प्रवर्गातून दोन मतदारांनी मतदान केल्याची नोंद आहे.

तालुक्याचे नाव/पंचायत समिती – पुरुष – महिला – इतर – एकूण टक्केवारी

मंडणगड – १३०५९- १३८३० – ० – २६८८९ – ४८.७९%

दापोली – ३५६३६ – ४००७९ – ० – ७५७१५ – ५३.८७%

खेड – ३९४५४ – ३९५८४ – ० – ७९०३८ – ५६.८९%

चिपळूण – ५७९८२ – ५६९१५ – ० – ११४८९७ – ६२.५६%

गुहागर – २४३०४ – ३०४२८ – ० – ५४७३२ – ५६.५२%

रत्नागिरी – ५९०६४ – ६०६१४ – २ – ११९६८० – ५८.५२%

संगमेश्वर – ४२१०० – ४३९०२ – ० – ८६००२ – ५३.८५%

लांजा – १८३४३ – १९४६१ – ० – ३७८०४ – ५१.१६%

राजापूर – २८७२० – ३१४७२ – ० – ६०१९२ – ४९.८७%

एकूण – ३१८६६२ – ३३६२८५ – २ – ६५४९४९ – ५५.७९%