Ratnagiri ZP Election Winner List 2026: रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूक ही यंदा कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक चर्चेची जिल्हा परिषद ठरली होती. विशेषत: राज्यातील बदललेली सत्तासमीकरणं, ठाकरे बंधूंची युती, राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याची चर्चा आणि भारतीय जनता पक्षासमोरील या समीकरणांमुळे उभी राहिलेली आव्हाने या पार्श्वभूमीवर या निवडणुकीकडे सगळ्यांचच लक्ष केंद्रीत झालं असताना आता या निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत.
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे ५६ निवडणूक विभाग व ९ पंचायत समित्यांमधील ११२ निवडणूक गण या ठिकाणी ७ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं. या मतदानाचे निकाल जाहीर करण्यात आले असून त्यानुसार रत्नागिरीमध्ये शिंदे गटाचं वर्चस्व प्रस्थापित झाल्याचं दिसून येत आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६ उमेदवार यादी…
हातखंबा – सुयोग कांबळे (शिवसेना)
गुहागर गण – प्रणव पोळेकर (शिवसेना)
वडदहसोळ गट – प्रतीक मटकर (शिवसेना)
तळवडे – समिक्षा चव्हाण (ठाकरे गट)
जुवाठी – रमेश सूद (शिवसेना)
धोपेश्वर – प्रसाद कुवळेकर (शिवसेना)
कातळी – सोनाली ठुकरूल (शिवसेना)
कातळी – अजय काशिंगकर (ठाकरे गट)
राजापूर पंचायत समिती
वडदहसोळ गण – गौतम जाधव (शिवसेना)
रायपाटण गण – उमेश पराडकर (शिवसेना)
तळवडे गण – भामिनी सुतार (ठाकरे गट)
ताम्हणे गण – योगी डांगे (ठाकरे गट)
केळवली गण – भाग्यश्री लाड (शिवसेना)
जुवाठी गण – प्रसाद मोहरकर (शिवसेना)
धोपेश्वर गण – योगेश नकाशे (अपक्ष)
पेंडखळे गण – राजेश गुरव (शिवसेना)
अणसुरे गण – दिपाली मेढेकर (ठाकरे गट)
श्रृंगारतळी – प्रमोद गांधी (मनसे)
कुडाळ – रुपेश पावसकर (बंडखोर)
मिरजोळे गण – वैभव पाटील (शिवसेना)
भांबेड गट – विनया गांगण (शिवसेना)
भांबेड गण – शैलेश खामकर (भाजपा)
प्रभानवल्ली गण – उमेश पत्की (शिवसेना)
अगलोली गट – विक्रांत जाधव (ठाकरे गट)
खेड गट – अरुण कदम (रामदास कदम यांचे बंधू) – शिवसेना</p>
खेड गट – अजय बिरवटकर (सुनील तटकरेंचा मेहुणा) – राष्ट्रवादी काँग्रेस
सावर्डे गट – पूजा निकम – राष्ट्रवादी काँग्रेस

