गेल्या पाच दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आहे. बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात येत आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयाचीही शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे. हा जनतेचा आक्रोश असून आम्ही त्याला थांबवू शकत नसल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हणलं आहे.

तानाजी सावंत यांच्यावर राऊत आक्रमक

तानाजी सावंत यांनी शिवसेने संधी दिली. मात्र, सध्या सावंतांनी शिवसेनेसोबत गद्दारी करत बंडखोरांशी हातमिळवणी केली आहे. अशा लोकांना मी रस्त्यावर कपडे काढून उघडे उभा करतो, असे आक्रमक शब्द राऊत यांनी काढले आहेत. तुम्हाला विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी केलं. तुम्हाला सर्व काही दिले, पैसेही दिले, तुम्हाला निवडून आणण्यासाठी आमदार केले आणि आता तुम्ही पळून गेलात तर कार्यकर्त्यांना राग येईल. आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्याचा रोष तुम्ही पाहिलाच आहे आजही नवीन कोणी नाही.

५६ वर्षांपासून ‘राग’ ही शिवसेनेची ताकद आहे
शिवसेनेची ५६ वर्षांपासूनची ताकद केवळ हाच राग आहे. आपण जगतो म्हणून श्वास घेतो, प्रत्येक श्वासात राग असतो. एकनाथ शिंदेंनी पक्षात पर यावे. ते आमचे मित्र, भाऊ आहेत, असे राऊत म्हणाले. कधी सुरत कधी गुवाहाटी असं दारोदारी फिरण्याची काय गरज? तुम्ही घरी या आणि आमच्याशी बोला उद्धव ठाकरे साहेब तुमच्याशी बोलायला बसले आहेत. पक्षाकडून आणि उद्धव ठाकरेंकडून नेमकी कोणती चूक झाली ते सांगावे असे आवाहन राऊत यांनी केलं आहे.

ठाकरेंच्या नावावर शिवसेना जिवंत
एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, नारायण राणे एवढंच काय तर, शिवसेना फक्त ठाकरेंच्या नावानेच जिवंत आहे आणि शिवसेनेचा आत्मा ठाकरेंच्या नावाशी जोडलेला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना बंडखोरी करण्यासाठी शिंदे, राणे, भुजबळ यांनी खूप प्रयत्न केले. पण ते सच्चे शिवसैनिक आहेत. जमिनीशी जोडलेले जे कार्यकर्ते आहेत. ते नेहमी बाळासाहेब ठाकरेंचा जयजयकार करतील. असेही राऊत म्हणाले.