scorecardresearch

Premium

“फडणवीसांनी राणांना आवर घालण्याची गरज आहे”, बच्चू कडूंच्या वक्तव्यावर रवी राणा प्रत्युत्तर देत म्हणाले…

“बच्चू कडू कधी इकडे कधी तिकडे असतात, त्यांनी…”, असेही रवी राणांनी सुनावलं आहे.

bacchu_kadu_and_ravi_rana
रवी राणांनी केलेल्या विधानावर बच्चू कडूंनी प्रत्युत्तर दिलं आहे. ( संग्रहित छायाचित्र )

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभय असल्यामुळे राणा दाम्पत्य काहीही वक्तव्य करतात. राणांना फडणवीसांनी आवर घातली पाहिजे, असं प्रहार संघटनेचे अध्यक्ष, आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं होतं. याला आमदार रवी राणा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सरकारला ब्लॅकमेल करून काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आवर घालण्याची गरज आहे, अशी टीका रवी राणांनी बच्चू कडूंवर केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

रवी राणा म्हणाले, “मी देवेंद्र फडणवीसांबरोबर ११-१२ वर्षापासून आहे. सुख आणि दु:खात एकत्र राहणारे व्यक्ती आम्ही आहोत. पळ काढणारे नाहीत. बच्चू कडू कधी इकडे कधी तिकडे असतात. त्यांनी सल्ला देण्याचं काम करू नये.”

supriya sule ajit pawar gopichand padalkar
“अजित पवारांचा अपमान करण्यासाठी भाजपानं…”, पडळकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळे संतापल्या
rupali chakankar supriya sule
“…हे म्हणजे शिळ्या कढीला उत आणण्यासारखं आहे”, रूपाली चाकणकरांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर
bacchu_kadu_and_ravi_rana
“घोडा मैदान समोर आहे, कोण…”, बच्चू कडूंचा रवी राणांना सूचक इशारा
yashomati thakur bacchu kadu navneet rana
“यशोमती ठाकूरांनी रवी राणांकडून कडक नोटा घेतल्या”, नवनीत राणांच्या वक्तव्यावर बच्चू कडू म्हणाले…

हेही वाचा : “यशोमती ठाकूरांनी रवी राणांकडून कडक नोटा घेतल्या”, नवनीत राणांच्या वक्तव्यावर बच्चू कडू म्हणाले…

“मला पाडण्यासाठी सर्व नेते निवडणुकीत एकत्र येतात. पण, जनता नेहमी माझ्याबरोबर असते. बच्चू कडूंना आवर घालण्याची गरज आहे. सरकारला ब्लॅकमेल करून काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आवर घालण्याची गरज आहे. आम्ही कधी मंत्रीपद, तिकीट किंवा कोणतं पद मागितलं नाही,” असं रवी राणांनी म्हटलं.

हेही वाचा : “रामाने विभीषणाला फोडलं होतं”, महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल बच्चू कडूंचं वक्तव्य, म्हणाले…

“देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याबरोबर राहून जिल्ह्याचा विकास करण्याचा संकल्प घेऊन मी काम करतोय,” असं रवी राणांनी सांगितलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ravi rana reply bacchu kadu over devendra fadnavis navneet rana statement ssa

First published on: 16-09-2023 at 18:30 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×