नागपुरात भाजपाकडून शक्तीप्रदर्शन सुरु असतानाच दुसरीकडे धक्का; मोठ्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

भाजपा नेते आणि आरएसएस स्वयंसेवक राहिलेले नगरसेवक छोटू भोयर यांनी भाजपा सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला

Nagpur, Ravindra aka Chhotu Bhooyar, Congress, Vidhan Parishad Election, BJP, भाजपा, छोटू भोयर, चंद्रशेखर बावनकुळे
भाजपा नेते आणि आरएसएस स्वयंसेवक राहिलेले नगरसेवक छोटू भोयर यांनी भाजपा सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला

नागपुरात विधानपरिषदेच्या निवडणुकीआधी भाजपाला मोठा धक्का बसला आहे. एकीकडे भाजपाकडून चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देत अर्ज भरण्याआधी शक्तीप्रदर्शन करण्यात आलं असता दुसरीकडे भाजपा नेते रवींद्र उर्फ छोटू भोयर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

भाजपा नेते आणि आरएसएसचे स्वयंसेवक राहिलेले नगरसेवक छोटू भोयर यांनी सोमवारी भाजपा सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या शहर कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. छोटू भोयर मंगळवारी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात नामांकन अर्ज भरणार आहेत. छोटू भोयर यांच्या पक्षप्रवेशादरम्यान काँग्रेसचे अनेक मोठे नेते उपस्थित होते. भोयर यांचा काँग्रेस प्रवेश भाजपच्या पराभवाचे संकेत असल्याचं पालकमंत्री नितीन राऊत म्हणाले आहेत.

छोटू भोयर यांनी यावेळी जितकी मते भाजपाकडे अधिक आहेत तेवढ्याच मतांनी त्यांचा उमेदवार पराभूत होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान यावेळी त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही निशाणा साधला. “निवडणूक लढवणार नाही असं बावनकुळे म्हणाले होते. पण ते कार्यकर्त्यांशी खोटे बोलत होते. त्यांनी तिकीट मिळावे म्हणून प्रयत्न केले. ज्या कारणांसाठी त्यांना विधानसभेत तिकीट नाकारले ती कारणे संपली का हे भाजपाने जाहीर करावे,” अशी मागणी छोटू भोयर यांनी यावेळी केली. दरम्यान काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर छोटू भोयर नितीन राऊत यांच्या कारमधून रवाना झाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ravindra aka chhotu bhooyar joins congress vidhan parishad election bjp chandrashekhar bawankule sgy

Next Story
‘कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही’!