scorecardresearch

शरद पवारांचं आयुष्य आग लावण्यातच गेलं; सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य; म्हणाले “त्यांनी पवार आडनाव बदलून…”

“शरद पवारांचं सर्व आयुष्य आग लावण्यामध्येच गेलं आहे”

Rayat Kranti Sanghatna, Sadabhau Khot, NCP, Sharad Pawar,
"शरद पवारांचं सर्व आयुष्य आग लावण्यामध्येच गेलं आहे"

रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी शरद पवारांनी आडनाव बदलून ‘आगलावे’ लावावं असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत. सांगलीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यासंबंधी बोलताना सदभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली. सदाभाऊ सोलापूर दौऱ्यावर असून यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“शरद पवार हे महान नेते आहेत. त्यांनी या राज्यामध्ये काड्या करण्यापलीकडे काही केलं नाही. जाईल तिथं आग लावायची आणि दुसऱ्या घराला परत आग लावायला निघून जायचं. त्यांचं सर्व आयुष्य हे आग लावण्यामध्येच गेलं आहे. त्यामुळे त्यांनी पवार हे आडनाव बदलून ‘आगलावे’ करावं. हे राज्य होरपळून निघालं असून आता थांबलं पाहिजे,” अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार?; आदित्य ठाकरे म्हणाले, “पक्ष एकमेकांविरोधात…”

सदाभाऊ खोत यांनी यावेळी शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या डायरीतील मातोश्री उल्लेखावरुनही निशाणा साधला. “आईला काही उपहार दिलं असेल तर ते आम्ही डायरीत लिहून ठेवत नाही. आईचे अनंत उपकार असतात, त्यामुळे आईला काही दिलं तर ते डायरीत कोणी लिहून ठेवत नाही. पण आई वसुलदार असेल तर मात्र लिहून ठेवले जाते. नामकरण झालेल्या मातोश्रींवर उपकार केलेले मात्रं लिहून ठेवले जातात. आई ही वसुली अधिकारी नसते मात्रं जिथं वसुली होते तिथं मात्र लिहून ठेवले जाते,” असंही सदाभाऊ खोत म्हणाले.

अमोल मिटकरींचं प्रत्युत्तर –

“शरद पवारांवर बोलताना आपण एवढ्या महान सुर्यासमोर बोलत आहोत…तिकडे थुंकण्याचा प्रयत्न केला तर थुंकी आपल्या तोंडावर उडते इतकं ज्ञान सदाभाऊंना असावं. सदाभाऊंना पुढील आमदारकी टिकवायची आहे. सदाभाऊ किंवा त्यांचा मित्र हे स्वत: बोलत नाहीत. यांचे मास्टरमाइंड देवेंद्र फडणवीस आहेत असं माझं स्पष्ट मत आहे,” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे.

पुढे ते म्हणाले की. “आग लावण्याचं भारतातील काम भाजपा करत आहे. आपलाच पक्ष आग लावण्याचं काम करत असून शरद पवारांचं नाव घेत आहेत. भाजपापासून महाराष्ट्राला धोके निर्माण झाले असून आग कोण लावत आहे हे सर्वांना माहिती आहे. सदाभाऊंच्या बोलण्याला पक्षात काही महत्व नाही. पुढील आमदारकी भेटावी यासाठी त्यांची ही धडपड आहे”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rayat kranti sanghatna sadabhau khot on ncp sharad pawar sgy

ताज्या बातम्या