त्रिपुरातील घटनांच्या निषेधार्थ राज्यात मुस्लीम संघटनांनी काढलेल्या मोर्चादरम्यान दगडफेक, मारहाण करण्यात आली. त्याचा निषेध नोंदवण्यासाठी भाजपाने शनिवारी ‘अमरावती बंद‘ पुकारला. त्याला हिंसक वळण लागले. दोन्ही गट समोरा समोर आल्याने दंगल सदृश स्थिती निर्माण झाली होती. यावरुन भाजपा आमदार नितेश राणेंनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

 “अमरावतीमध्ये १३ नोव्हेंबर रोजी हिंदू संघटनांनकडून काढण्यात आलेल्या मोर्चामुळे दंगल झाल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. १२ नोव्हेंबरला नांदेडला काढण्यात आलेला मोर्चा रझा अकादमीने काढला होता. यामध्ये त्रिपुरामध्ये जी घटना घडली त्यासाठी मोर्चा काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. रझा अकादमीच्या लोकांनी एक फोटो दाखवावा की त्रिपुरामध्ये हिंदूनी मज्जीद पाडली असे मी त्यांना आव्हान देतो. मोर्चा काढण्याचे कारणच सत्य नव्हते. त्रिपुराच्या महासंचालकांनी तेव्हाच हे सत्य नाही सांगितले. रझा अकादमीने शांतप्रिय मोर्चा काढायला हवा होता. हिंदूंना का मारलं याचे उत्तर राज्य सरकार रझा अकादमीला का विचारत नाहीत,” असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.

Uddhav Thackeray, Mahayuti, campaign,
उद्धव ठाकरे यांना आयतेच कोलीत
kolhapur, hatkanangale, BJP, Maharashtra Kranti Sena Party, Constituent Party in mahayuti, Maharashtra Kranti Sena in mahayuti, lok sabha 2024, election 2024,
महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाला घटक पक्ष म्हणून मान्यता; भाजपकडून मित्र पक्षांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न
Devendra Fadnavis On Praful Patel Statement
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते”; प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “हे सत्य…”
eknath shinde
मित्रपक्षांकडून युती धर्माचे पालन नाही; शिंदे गटाच्या आमदारांकडून नाराजी; ठाणे, पालघर पक्षाकडेच ठेवण्यासाठी आग्रह

“रझा अकादमी ही अतिरेकी संघटना आहे हे मी फार जबाबदारीने  म्हणतो आहे. जशा दहशतवादी संघटना काम करतात तशी ही संघटना काम करत आहे. मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचे काम ही रझा अकादमी करत आहे. रझा अकादमी ज्यांनी सुरु केली ते अफगाणिस्तानातील आहेत. त्यांच्याकडून वेगळी काय अपेक्षा ठेवायची. तीन तलाकचा विरोध या रझा आकदमीने केला. मुस्लीम समाजाचा विकास होणे रझा अकादमीला मान्य नाही. त्यांनी करोना लसीकरणाला विरोध केला होता. फ्रांसच्या राष्ट्रपतीच्या भाषणाला देखील रझा अकादमीने विरोध केला,” असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.

अमरावतीत तणावपूर्ण शांतता, इंटरनेट व संचारबंदी कायम ; ९० जण अटकेत, भाजपसह अनेक नेते स्थानबद्ध

“देगलूरच्या मतदारांना आम्ही सांगत होतो काँग्रेसचा आमदार निवडून देऊ नका. देगलूरमध्ये जर भाजपाचा आमदार असता तर अशी दंगल घडली नसती. संरक्षण करण्यासाठी भाजपा कार्यकर्ते पुढे असते. आज जिथे जिथे दंगल घडलेली आहे तिथे सर्व आमदार काँग्रेस, शिवसेना आणि एमआयएमचे आहेत. महाविकास आघाडीमधील घटकपक्षांच्या मतदार संघामध्ये या सगळ्या दंगली भडकवल्या जात आहे याची नोंद महाराष्ट्रातील जनतेने घ्यावी,” असे नितेश राणे म्हणाले.

“१२ नोव्हेंबरला नांदेडला मोर्चा काढला त्याची जबाबदारी रझा अकादमीची होती. मोर्चाच्या माध्यमातून हिंदूंवर हल्ला करण्यात   आला आणि त्यांची दुकाने फोडण्यात आली. त्रिपुरात मशिद जाळल्याची खोटी घटना असूनही महाराष्ट्रात दंगल घडवण्यात आली. याला उत्तर म्हणून हिंदू संघटना पुढे आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले,” असे नितेश राणे म्हणाले.

“‘हिंदू मार नही खायेगा’ अशी अमरावतीत स्वाभाविक प्रतिक्रिया…”, हिंसाचारावर चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य

“रझा अकादमीवर बंदी घालण्यात यावी. रझा अकादमी ज्यांनी सुरु केली ते अफगाणिस्तानातील आहेत. महाराष्ट्र सरकारने त्यांना अटक करावी. महाविकास आघाडीतर्फे भाजपा आणि इतर हिंदू संघटनांवर आरोप केले जात आहेत. १२ नोव्हेंबरला मोर्चा काढण्यात आला त्याची १० दिवसांपासून सुरु होती. रझा अकादमीवर कारवाई करण्यात यावी,” अशी आमची मागणी आहे. 

“हिंदूवरचे अत्याचार आम्ही सहन करणार नाही. रझा अकादमीची कामे महाराष्ट्रात बंद झाली नाहीत तर आम्हाला हिंदू म्हणून रस्त्यावर उतरावे लागेल. मग स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कोणत्याही टोकावर जाण्याची तयारी असेल,” असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.

“तुम्हाला राज्यात जातीय दंगली घडवायच्या होत्या का?  राज्यात वातावरण खराब करण्याचे काम या सरकारने केल्याचा माझा थेट आरोप आहे. तुम्ही एक मोर्चा काढला तर आम्ही १० मोर्चे काढू हे रझा अकादमीने लक्षात ठेवावे,” असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.