“आम्ही सत्तेसाठी कधीही…”; नॉट रिचेबल असणाऱ्या एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया | Reaction of Eknath Shinde who is not reachable abn 97 | Loksatta

“आम्ही सत्तेसाठी कधीही…”; नॉट रिचेबल असणाऱ्या एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे

“आम्ही सत्तेसाठी कधीही…”; नॉट रिचेबल असणाऱ्या एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तीन प्रस्ताव दिल्याची चर्चा आहे

विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर नॉट रिचेबल असलेल्या शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे हे सध्या गुजरातमध्ये आहेत. त्यांच्यासोबत काही समर्थक आमदार असल्याने महाविकासआघाडी सरकार धोक्यात असल्याच्या चर्चांनाही उधाण आलंय. अशातच एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केले आहे. याआधी भाजपा आमदार असलेले संजय कुटे हे एकनाथ शिंदे आणि इतर आमदार असलेल्या ठिकाणी पोहोचले आहेत.

“आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही,” असे एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

एकनाथ शिंदेंच्या बंडावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हा शिवसेनेचा…”

विश्लेषण : एकनाथ शिंदे बंड; फुटीर आमदारांवर पक्षांतरबंदी कायदा लागू होणार का?

याआधी नॉट रिचेबल असलेल्या एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तीन प्रस्ताव दिल्याची चर्चा होती. शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडावी आणि भाजपासोबत सरकार स्थापन करावं, असा पहिला प्रस्ताव एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. तर आगामी नवीन सरकारमध्ये भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असतील, असा दुसरा प्रस्ताव आहे. उपमुख्यमंत्रीपद मिळालं तरच एकनाथ शिंदे गट शिवसेनेत राहील, असा तिसरा प्रस्ताव असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबतचं वृत्त टीव्ही ९ मराठीने दिलं आहे.

शरद पवारांची प्रतिक्रिया

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत पहिली प्रतिक्रिया देताना या प्रश्नावर चर्चेमधून तोडगा निघू शकतं असं म्हटलं आहे. हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत असून एकनाथ शिंदेंचा प्रश्न हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असून त्यांच्याकडून आमच्याशी संपर्क साधण्यास आसल्यास चर्चा करु. आज सायंकाळी मी मुंबईला रवाना होणार आहे. सायंकाळी मुंबईमध्ये बैठक होईल अशी शक्यताही पवारांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या गटनेते पदावरुन एकनाथ शिंदे यांना हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी आमदार अजय चौधरी यांच्याजवळ ही जबाबदारी देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंच्या बंडावर काँग्रेसने भूमिका केली स्पष्ट, बाळासाहेब थोरात म्हणाले “गरज भासल्यास…”

संबंधित बातम्या

“छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव जरी घेतले तरी…”; शिवरायांबद्दल बोलताना अमोल कोल्हेंचा माईक बंद केल्याने NCP चा हल्लाबोल
Maharashtra News Live : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी राज्यातील सर्व खासदारांची मोदींसमवेत बैठक; वाचा महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!
राज्यपालांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे भावना भडकवत आहेत का? उदयनराजेंनी दिलं उत्तर, म्हणाले “भाजपाने त्यांना…”
Chhatrapati Shivaji Maharaj: तुम्ही महाविकास आघाडीच्या आंदोलनात सहभागी होणार? उदयनराजेंनी केलं स्पष्ट, म्हणाले…
“…तर माझी मुलगी जिवंत असती”, श्रद्धा वालकरच्या वडिलांचे पोलिसांवर गंभीर आरोप, चौकशीची मागणी

व्हिडिओ

ताज्या बातम्या
‘त्या’ व्हिडीओमुळे चर्चेत असलेले राम गोपाल वर्मा इंजिनियर असूनही चित्रपटसृष्टीत कसे आले? घ्या जाणून
INDW vs AUS T20Is: “हल्के मे मत लो!” ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी भारतीय महिला संघाचा आव्हान उभे करणारा video व्हायरल
पुणे: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानासाठी मंगळवारी पुणे बंद
“फुले-आंबेडकर, कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली”, चंद्रकांत पाटलांचं विधान
Sania Shoaib Divorce: सानिया मिर्झा सोबतच्या घटस्फोटावर अखेर शोएब मलिकने सोडले मौन; म्हणाला…