साडेतीन शक्तीपिठापकी एक प्रमुख शक्तीपीठ म्हणून ओळखल्या जाणार्या करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीच्या नवरात्रोत्सोवाची तयारी पुर्ण झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी प्राथमिक सुविधांची पुर्तता किती कार्यक्षमतेने होणार यावरच उत्सवाचे यशापयश अवलंबून आहे. महालक्ष्मी मंदिर परीसरासाठी कोटीच्या कोटी उड्डाने करण्याच्या बाता आघाडी शासनाकडून झाल्या असल्यातरी त्यासर्व कागदावरच राहीलेल्या आहेत. कोटींच्या कामाचे नियोजन करायचे तेव्हा करा, पण अगोदर दोन-पाच लाखाची किरकोळात आवरणारी स्वच्छता व प्राथमिक गरजाची पुर्तता करणारी कामे एकदाची करुन टाका, अशी मागणी भाविकातून होत आहे. वर्षांनुवर्ष त्या छोटया कामांकडे दुर्लक्ष केले गेल्याने मंदिर परिसरातील अस्वच्छता हा वादाचा विषय बनला आहे.
महालक्ष्मी मंदिर परिसराचा विकास आराखडा करण्याची घाई राज्य शासनाकडून अनेकदा केली गेली गतवर्षी 120 कोटी रुपयांचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा चच्रेत आला. या आराखडयानूसार मंदिर परिसराला जोडले जाणारे मुख्य रस्ते, बाहय वळण रस्ते, वाहन तळ, नवदुर्गा दर्शन, फुटपाथ, भक्त निवास व्यवस्था, रंकाळा तलाव सुधारणा आदि कामांचा समावेश होता. या कामासाठी राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात 10 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती.
महिन्यापूर्वी जिल्हयाच्या दौर्यावेळी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण मुंबई गाठण्यापूर्वी धनादेश हाती पडेल अशी राणा भिमदेवी थाटाची घोषणा केली होती. पण घोषणा करणारे मंत्रीही तिकडे आणि त्यांनी घोषीत केलेला निधीही तिकडेच अशी दुरावस्था पहायला मिळत आहे. गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी मंदिर विकास आराखडयात पुढाकार घेतला होता. निधी आणण्याची सुतोवाचही त्यांनी अनेकदा केले. पण त्याची पुर्तता मात्र झालेली नाही.
महालक्ष्मी मंदिराचा विकास आराखडा रखडला आहे. विधानसभेच्या निवडणूकीची आचारसंहिता सुरु होण्यापूर्वी काही भरिव निधी, महालक्ष्मी मंदिर व परिसराचा विकास घडून येईल. फोल ठरली आहे. प्रशासनाने मात्र आपल्या पातळीवर यंदाचा नवरात्रोउत्सव सुरळीत पार पडावा यासाठी आपल्या परिने चालवली आहे. मात्र मंदिर परिसरातील अस्वच्छता हे मोठे आव्हान बनलेले आहे. विशेषत महालक्ष्मी बँकेकडून वाहन तळाकडे येणारा मार्ग हा सदोदित दुर्गधीयुक्त असतो. पावसाळयात तर भाविकांना आपण पावसाच्या पाण्यातून चालत आहोत की, मलमुत्र ओलाडून पुढे सरकत असतो हेच मुळी कळत नसते. येथील ड्रेनेज व्यवस्था दुरुस्त करणे गरजेचे असून त्यासाठी 5 लाख रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. तो देण्याची घोषणा अनेकांनी केली. पण फुटकी कवडीही मिळाली नसल्याने अस्वच्छतेचा प्रश्न कायम आहे.
मध्यवर्ती बस स्थानक, रेल्वे स्टेशन, वाहनतळ असलेला  िबदू चौक परिसर येथून महालक्ष्मी मंदिराकडे जाण्याचा नेमका मार्ग कोणता याचे दिशा दर्शन नेमके पणाने होत नाही. परिणामी परगावाहून येणार्या भाविकांना थांबत थांबत पण अडथळे पार करीत कसे बसे मंदिर गाठावे लागते. नवरात्रीमध्ये अनवाणी चालणार्या भाविकांची संख्याही मोठी असते. शहरातील रस्त्यांची अवस्था विशेषत महालक्ष्मी मंदिराकडे येणार्या रस्त्यांत खाचखळगे असल्याने अशा भाविकांना रस्त्यांवरुन चालणे मुश्कीलीचे बनते. फेरी विक्रेत्यांचे नियोजन केल्याचा दावा प्रशासनाकडून झाला असला तरी तो प्रत्यक्षात किती अचूकपणे आमलात येतो यावरच नवरात्र उत्सवाचे यशापयश अवलंबून आहे.