|| हर्षद कशाळकर
नऊ वर्षांची प्रतीक्षा संपली; यंदा विद्यार्थ्यांना प्रवेश
अलिबाग: नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अलिबाग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे रायगडकरांचे वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या वर्षीपासूनच या महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. गेली नऊ वर्षे वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव लाल फितीत अडकला होता.

Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
Admission Delayed, 500 Students of college of physican and surgeon, Maharashtra, 500 Students Still Awaiting Admission, physician students, surgeon students, admission awating physican students,
मान्यतेनंतरही सीपीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यास मुहूर्त सापडेना, ५०० जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत
High Court relief
वैद्यकीय विषयाच्या विद्यार्थ्याला उच्च न्यायालयाचा दिलासा, पुनपर्रीक्षेची गुणपत्रिका देण्याचे राज्य शिक्षण मंडळाला आदेश
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…

राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने ३१ जानेवारी २०१२ मध्ये केंद्र सरकारच्या भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मान्यतेच्या अधीन राहून अलिबाग येथे १०० विद्यार्थी क्षमता असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ५०० खाटांच्या संलग्न रुग्णालयाला सुरू करण्यास मान्यता दिली होती. तत्कालीन वित्त व नियोजनमंत्री सुनील तटकरे यांनी प्रयत्न करून हे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून घेतले होते. मात्र नंतरच्या काळात जागेअभावी तसेच राजकीय विरोधामुळे हा प्रस्ताव लाल फितीत अडकला होता.

त्या वेळी अलिबाग येथे वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा देण्यास काही राजकीय पक्षांनी विरोध केला होता. तसा ठरावही घेण्यात आले होते. ज्या जागा पाहण्यात आल्या  त्या महाविद्यालयासाठी योग्य नसल्याचे अहवाल देण्यात आला होता. त्यामुळे राज्य सरकारच्या प्रस्तावाला भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची मान्यता मिळू शकली नव्हती. नंतरच्या काळात सुनील तटकरे यांना राजीनामा द्यावा लागला. राज्यातील आघाडी सरकारही गेले. त्यामुळे हा प्रस्ताव अडगळीत जाऊन पडला होता.

आदिती तटकरे यांचे प्रयत्न

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर या प्रस्तावावरची धूळ पुन्हा एकदा झटकली गेली. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी पुन्हा एकदा प्रयत्न सुरू केले. महाविद्यालयासाठी जागेचा प्रश्न सुरुवातीला निकाली काढणे गरजेचे होते. उसर येथे एमआयडीसीच्या ताब्यात असलेली जागा पडून होती. ही जागा तसेच त्यालगत असलेली जागा वैद्यकीय महाविद्यालयासाठी घेण्याचे निश्चित करण्यात आले. उद्योग विभागाकडून जागा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करून घेण्यात आली. तत्कालीन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी ५२ एकर जागा वैद्यकीय महाविद्यालयासाठी देण्याबाबतचे आदेश जारी केले.

   त्यामुळे महाविद्यालयाच्या जागेचा मुद्दा निकाली निघाला. मात्र इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी तीन ते चार वर्षांचा कालावधी लागणार होता. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात हे महाविद्यालय तातडीने सुरू करता यावे यासाठी पर्यायी जागांचा शोध घेण्यात आला. कुरुळ येथील आरसीएफ कॉलनीतील शाळेची जुनी इमारत तसेच सहा निवासी इमारती,  सहा एकर मोकळी जागा, तीन वर्षांसाठी वैद्यकीय महाविद्यालयासाठी भाडेतत्त्वावर घेण्यात आले.

वैद्यकीय महाविद्यालयासाठी ३०० खाटांच्या रुग्णालयाची आवश्यकता होती. त्यामुळे जिल्हा रुग्णालय तीन वर्षांसाठी वैद्यकीय महाविद्यालयाला संलग्न करण्यात आले. यासाठी जिल्हा रुग्णालयाची खाटांची क्षमता २०० वरून ३०० पर्यंत वाढविण्यात आली. महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांची नियुक्ती करण्यात आली. ४४ अध्यापकांना अलिबाग येथे प्रतिनियुक्ती देण्यात आली. चार वर्षांत १ हजार ७२ पदे निर्माण करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली. वैद्यकीय महाविद्यालय आणि नवीन रुग्णालयाच्या इमारतीसाठी ४०६ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता दिली, तर वैद्यकीय उपकरणे आणि जिल्हा रुग्णालयातील इमारत दुरुस्तीसाठी जवळपास १८ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला.

आठ महिन्यांत कामे मार्गी

महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या आठ महिन्यांत ही सर्व कामे मार्गी लावण्यात आली. या सर्व तयारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या पथकाने अलिबाग येथे येऊन वैद्यकीय महाविद्यालय तयारीचा आढावा घेतला होता. यानंतर १७ सप्टेंबरला अलिबाग येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत हे वैद्यकीय महाविद्यालय अखेर मंजूर करण्यात आले. या वर्षीपासूनच महाविद्यालयासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. 

नऊ वर्षांनंतर रायगडकरांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न पूर्ण होत आहे. या वर्षीपासूनच १०० विद्यार्थ्यांना यात प्रवेश दिला जाणार आहे. यामुळे महाविद्यालयामुळे जिल्ह्याच्या आरोग्य सुविधेला बळकटी प्राप्त होईल. त्याचबरोबर कोकणातील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिक्षणाची दालने खुली होत आहेत.

– आदिती तटकरे, पालकमंत्री, रायगड</strong>

अलिबाग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी गेले आठ महिने दिवसरात्र काम सुरू होते. राज्य सरकारकडून या कामाचा दैनंदिन प्रगतीचा आढावा घेतला जात होता. सर्व आवश्यक बाबींची अतिशय कमी वेळात पूर्तता करण्यात आली. निधीही उपलब्ध झाला, त्यामुळे राज्यातील इतर वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रस्ताव मंजुरीसाठी असताना अलिबागच्या वैद्यकीय महाविद्यालयाला सर्वात आधी भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची मान्यता मिळाली.

– डॉ. गिरीश ठाकूर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अलिबाग