सांगली: एकतर्फी प्रेमातून बनावट कागदपत्रांच्या आधारे विवाह नोंदणी प्रमाणपत्र तयार करून पिडीत युवतीची बदनामी करण्याचा प्रकार वाळवा येथे घडला असून पिडीतेच्या तक्रारीनंतर एका तरूणासह ११ जणाविरूद्ध आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीत युवतीचे दिलेल्या तक्रारीनुसार मुख्य संशयित तरूणाने सातत्याने पाठलाग करीत लग्नाची गळ घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, याला प्रतिसाद दिला नसल्याने त्यांने शाळेतील बोनाफाईड व अन्य बनावट कागदपत्राच्या आधारे विवाह नोंदणी प्रमाणपत्र तयार करून घेतले असून त्याआधारे लग्न झाल्याचे सांगत आहे. तसेच यामुळे माझी महाविद्यालय व गावात बदनामी केली असून मला यामुळे लग्नाची स्थळेसुध्दा येत नाहीत.

आणखी वाचा-आळंदी, देहूवरून निघालेल्या वारकऱ्यांसाठी अपुरी शौचालये, प्रकरण उच्च न्यायालयात

पिडीतेच्या तक्रारीनुसार संशयिताविरूध्द प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून बनावट कागदपत्राच्या आधारे विवाह प्रमाणपत्र देणे या कामात मदत करणारे आणि संशयित अशा ११ जणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.