चंद्रपूर जिल्ह्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पदार्फाश करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी दोन तरुणांना अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणात डॉक्टर व परिचारिका सहभागी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी क्राईस्ट हॉस्पिटलचे अतिदक्षता विभागाचे प्रभारी डॉक्टर जावेद सिद्दीकी व दोन परिचारिकांना अटक केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत ५ जणांना अटक करण्यात आली आहे.

क्राईस्ट रुग्णालयाने कोविड महामारीत अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. इथली ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची आणि उपचाराची क्षमता लक्षात घेता हे केंद्र कोविड उपचारात मोठे योगदान व रुग्णांना जीवदान देणारे ठरले. मात्र, एका घटनेमुळे रुग्णालय चर्चेचा विषय ठरले आहे. शुक्रवारी रात्री अन्न व औषध प्रशासन पथकाने एका गुप्त माहितीच्या आधारे गांधी चौक या गजबजलेल्या भागात रेमडेसिवीर विक्रेता आणि खरेदीदार या दोघांना ताब्यात घेतले होतं. गुन्हा नोंद करून हा तपास शहर पोलीस ठाण्याकडे सोपविण्यात आला. त्यानुसार काळा बाजारात आणखी कोण कोण सक्रिय आहे? याचा शोध घेत पोलीस क्राईस्ट रुग्णालयापर्यंत पोहोचले.

Onion auction closed for 11 days in nashik
कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प
Cyber ​​criminals, Jalgaon
सायबर गुन्हेगारांचा नफ्याच्या आमिषाने जळगावात अनेकांना गंडा; शिक्षक, डॉक्टरांचाही फसवणूक झालेल्यांत समावेश
domestic gas in Panvel
पनवेलमध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार
Mild earthquake tremors in Akola district
अकोला जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य हादरे

आता या प्रकरणात एकूण ५ जणांना अटक करण्यात आली आहे. शहर-जिल्ह्यात होत असलेल्या रेमडेसिवीरच्या काळाबाजाराचे हे धक्कादायक वास्तव आहे. या रुग्णालयाला वितरित होणारे इंजेक्शन इथली टोळी चढ्या किंमतीत बाहेर विकत असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. या टोळीने किती इंजेक्शन अशारीतीने बाहेर विकले, हे पोलीस चौकशीतून कळणार आहे. हे इंजेक्शन रुग्णाच्या नावे वितरित होत आहेत. त्यामुळे पैशाच्या लोभापायी किती रुग्ण इंजेक्शनविना मृत पावले, याची कल्पना न केलेली बरी आहे. रेमडेसिवीर काळाबाजाराची ही साखळी शहरातील खासगी हॉस्पिटल, शासकीय हॉस्पिटल तथा ग्रामीण भागात कार्यरत असल्याचं आता बोललं जात आहे.