जनतेसाठी जाणते राजे एकच आहेत ते म्हणजे आपल्या सर्वांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज. असं वक्तव्य करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ यांना उत्तर दिलं आहे. राज्यात सध्या स्वराज्यरक्षक आणि धर्मवीरवरून जो वाद रंगला आहे त्या वादावर प्रतिक्रिया देत असताना छगन भुजबळ यांनी शरद पवारांना आम्ही जाणता राजा म्हणणारच असं म्हटल्याबाबत फडणवीस यांना विचारलं गेलं. त्यावेळी त्यांनी हे उत्तर दिलं.

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

जाणता राजा म्हणण्यावरूनही चर्चा सुरू झाली आहे. आज छगन भुजबळ असं म्हणाले की आम्ही शरद पवारांना जाणता राजा म्हणणारच याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कुणाला काय म्हणायचं असेल ते म्हणावं. मात्र देशातले जाणते राजे एकच छत्रपती शिवाजी महाराज. बाकी ज्यांना कुणाला आपल्या नेत्यांना काय म्हणायचं आहे ते म्हणू द्या. जनता त्यांना असं म्हणणार नाही.”

kolhapur lok sabha marathi news, sanjay mandlik kolhapur marathi news
कोल्हापूरच्या आखाड्यात दत्तक प्रकरण तापणार ?
sanjay mandlik
राजे-मंडलिक गट यापुढेही समन्वयाने काम करेल – खासदार संजय मंडलिक
MP Sanjay Mandlik felicitated by NCP District President Babasaheb Patil Asurlekar
तर शाहू महाराजांना राज्यसभेवर का पाठवले नाही? संजय मंडलिक यांचा सवाल
Dilip Mohite patil,Shivajirao Adhalarao Patil
“आमच्यावर अविश्वास दाखवलात तर…”, पक्षप्रवेशावेळी मोहिते पाटलांचा शिवाजीराव आढळरावांना इशारा

अजित पवारांविषयी काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणण्यास कोणाचीच हरकत नाही. ते स्वराज्य रक्षक आहेतच. छत्रपती संभाजी महाराज हे देव, देश आणि धर्मासाठी लढले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज नसते तर महाराष्ट्रात हिंदू उरलेच नसते. त्यामुळे ते धर्मवीर आहेतच. त्यांना धर्मवीर न म्हणणे हा द्रोह असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. अनेक ठिकाणी भाजपाकडून निदर्शने करण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच शरद पवारांना जाणता राजा का म्हणू नये? असा सवाल करत विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

काय म्हणाले होते छगन भुजबळ?

शरद पवारांना जाणता राजा म्हटल्याने शिवाजी महाजारांचा अपमान होतो, असा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात येतो. याबाबतही त्यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, “शरद पवार यांना जाणता राजा म्हणण्याला माझं समर्थन आहे. कारण जो राज्यकर्ता असतो, त्याला पूर्वीच्या भाषेत जाणता राजा म्हटले जात होते. शरद पवारांनी सरकारच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले. पुणे, मुंबई, नाशिकमध्ये अनेक उद्योग शरद पवार यांनी आणले. शिक्षण क्षेत्र असेल किंवा सामाजिक क्षेत्र असेल, त्यांनी मोठं काम केलं आहे. त्यांच्यामुळेच आज महिलांना आरक्षण मिळालं आहे. त्यामुळे त्यांना जाणता राजा म्हणतात. जनतेच्या समस्यांशी एकरूप होऊन, जो प्रश्न मार्गी लावतो, तो जाणता राजा असतो.” असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलं होतं. मात्र त्याला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. जाणते राजे एकच छत्रपती शिवाजी महाराज असं त्यांनी म्हटलं आहे.