Republic Day 2023: धनंजय मुंडेंनी लेकीला दिले प्रजासत्ताकाचे धडे; मुलीसोबतचा व्हिडीओ केला ट्वीट!

धनंजय मुंडेंनी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुलीसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

dhananjay munde tweet video
धनंजय मुंडेंनी ट्वीट केला लेकीसोबतचा व्हिडीओ!

Republic Day 2023 News: आज ७४व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात मुंबईसह विविध ठिकाणी ध्वजारोहण आणि इतर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राजधानी दिल्लीतील राजपथावरील पथसंचलन आणि चित्ररथांची सालाबादप्रमाणे यंदाही चर्चा पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये धनंजय मुंडे त्यांच्या लेकीला प्रजासत्ताक दिनाबद्दलचे धडे देताना दिसत आहेत.

अग्रलेख : प्रजासत्ताकातील प्रजा

काय आहे व्हिडीओमध्ये?

हा व्हिडीओ धनंजय मुंडे यांच्या बीडमधील निवासस्थानातला आहे. व्हिडिओमध्ये धनंजय मुंडे पलंगावर झोपले असून त्यांच्या बाजूला त्यांची मुलगी आदिश्री उभी आहे. हातात भारताच्या राष्ट्रध्वजाचा एक फोटो घेऊन धनंजय मुंडे मुलीला प्रजासत्ताक दिनाविषयी माहिती देताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

Republic Day 2023 Live: नागपुरातील RSS च्या मुख्यालयात झेंडावंदन संपन्न!

“बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना नोव्हेंबर महिन्यात बनवली. ती नंतर सरकारने स्वीकारली. २६ जानेवारीपासून आपल्या देशात राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली. त्यामुळेच आपण २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणतो”, असं मुंडे आपल्या मुलीला सांगत आहेत.

Dhananjay Munde Car Accident: धनंजय मुंडेंच्या गाडीला अपघात, चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने घडली घटना

धनंजय मुंडेंचा अपघात आणि उपचार

काही दिवसांपूर्वी अपघातग्रस्त झाल्यामुळे धनंजय मुंडेंवर काही दिवस रुग्णालयात उपचार करण्यात आले. रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार धनंजय मुंडे सध्या त्यांच्या निवासस्थानीच आराम करत असून तिथेच त्यांच्यावर पुढील आवश्यक उपचार होत आहेत. एका अपघातामध्ये धनंजय मुंडेंच्या छातीला दुखापत झाली होती. त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 08:40 IST
Next Story
Petrol-Diesel Price on 26 January: पेट्रोल डिझेलचे नवे दर जारी, पाहा तुमच्या शहरातील दर
Exit mobile version