Republic Day Police Medals : महाराष्ट्रातील चार अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ जाहीर; ३१ पोलिसांचा शौर्यपदकाने सन्मान!

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पोलीस पदकांची घोषणा

maharashtra bags 31 Gallantry awards
(फोटो-लोकसत्ता ग्राफीक्स टीम)

Police Medals : प्रजासत्ताक दिनाच्या दिनानिमित्त ९०१ पोलीस कर्मचाऱ्यांचा पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. यापैकी १४० पोलीस कर्मचाऱ्यांचा शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. तर ९३ पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आलं आहे. याशिवाय गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ६६८ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदक जाहीर झालं आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील ३१ पोलिसांना शौर्य पोलीस पदक जाहीर झाले आहे. तसेच, चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक आणि ३९ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना गुणवंत पोलीस पदक जाहीर झाले आहे.

Republic Day 2023 Live: “…अशी माझी इच्छा आहे”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना शुभेच्छा देताना व्यक्त केली इच्छा!

मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अनुप कुमार सिंह, मुंबईतील पोलीस उपनिरीक्षक संभाजी देशमुख आणि ठाण्यातील उपनिरीक्षक दीपक जाधव या चार अधिकाऱ्यांचा राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झालेल्यांमध्ये समावेश आहे. याशिवाय नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या मध्यवर्ती गुन्हेशाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कडनोर यांना गुणवंत पोलीस पदक जाहीर झाले आहे. याशिवाय परिक्षेत्रातील सुखदेव मुरकुटे यांनाही गुणवंत पोलीस पदक जाहीर झाले आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांनी साकारल्या देशभक्तीपर प्रतिमा

ज्या पोलीस कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे, त्या १४० कर्मचाऱ्यांपैकी ८० जण हे डाव्या विचारसरणीचा प्रभाव असलेल्या, दहशतग्रस्त भागात सेवा बजावणारे आहेत. शौर्य पदक प्राप्त करणाऱ्यांमध्ये सीआरपीएफचा अव्वल क्रमांक असून त्यांनी ४८ पदकं मिळवली आहेत. तर महाराष्ट्राने ३१ पदकं मिळवली आहेत. जम्मू-काश्मीर -२५, झारखंड -९, दिल्ली, छत्तीसगड, बीएसएफचे सात-सात जवान आहेत. उर्वरित जवान अन्य राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि सीएपीएफचे आहेत.

Republic Day 2023 Parade BSF च्या महिला कॅमल राईडर्स ‘कर्तव्य पथा’वर करणार संचलन

याशिवाय, ५५ जवानांना होमगार्ड व सिविल डिफेंस मेडलने सन्मानित करण्यात आलं आहे. हे शौर्य पदक होमगार्ड आणि नागरिक सुरक्षेसाठी जवानांच्या शौर्यासाठी दिले जाते. उत्कृष्ट सेवा आणि नागरी संरक्षणासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते विशिष्ट सेवा आणि नागीर संरक्षण पदक प्रदान केले जाते. हे पदक ९ जवानांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी आणि ४५ जवानांना नागरी संरक्षणासाठी दिले जाते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 15:01 IST
Next Story
“फडणवीसांच्या अटकेचा कट शरद पवारांनी रचला”; गुणरत्न सदावर्तेंचा खळबळजनक दावा; म्हणाले, “मला अटक झाली तेव्हा…”
Exit mobile version