कराड :  कोयनानगर परिसरात पर्यटकांना आकर्षित करण्यासारखी  मोठय़ा प्रमाणात पर्यटनस्थळे आहेत. यातील काही पर्यटनस्थळांच्या विकासासाठी निधी प्राप्त झाला आहे. तरी पर्यटन विकासाचा सुधारित आराखडा लवकरात लवकर तयार करुन मंजूर कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे गृहराज्यमंत्री  शंभूराज देसाई यांनी  दिले.

कोयनानगर येथे वन्यजीव विभाग व प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या मंजूर विकासकामांच्या आढाव्याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, प्रांताधिकारी सुनील गाडे, वन्य जीव विभागाचे उपसंचालक उत्तम सावंत, तहसीलदार रमेश पाटील, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे, जिल्हा नियोजन अधिकारी  शशिकांत माळी, कोयनाधरण व्यवस्थापन विभागाचे उपविभागीय अभियंता आशिष जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?
tadoba andhari tiger reserve marathi news, nagzira sanctuary marathi news
Video: ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील आणखी एक वाघीण नागझिरा अभयारण्यात
rail line to Karjat
कर्जतला जाण्यासाठी आणखी एक रेल्वे मार्ग, पनवेल – कर्जत रेल्वे मार्ग डिसेंबर २०२५ पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य
Navi Mumbai Traffic congestion
नवी मुंबई : सलग सुट्ट्या आणि मेळाव्याने एपीएमसी परिसरात वाहतूक कोंडी

कोयनाधरण परिसरात पर्यटक वाढावेत यासाठी चांगली कामे करा. नेहरू उद्यानासाठी शासनाकडून निधी  प्राप्त झाला  आहे. या निधीतून उद्यानातील नवीन कामे हाती घ्यावीत. विशेषत: या उद्यानात विविध फुलांची झाडे लावण्यावर भर द्यावा. कोयनानगर परिसरात पर्यटकांच्या सोयीसाठी  पर्यटन परिचय केंद्र उभे करावयाचे आहे. या परिचय केंद्राचा चांगला आराखडा तयार करा. यासाठी तज्ज्ञ वास्तू विशारदाची  नेमणूक करावी. प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत नेहरू उद्यानाचे सुशोभीकरण, कोयनानगर येथील  जुन्या झालेल्या कारंजाचे सुशोभीकरण, कोयनानगर धरण व्यवस्थापनाचे जीर्ण झालेल्या विश्रामगृहाचे नूतनीकरण ही कामे तातडीने हाती घ्यावीत, अशा सूचनाही मंत्री शंभूराज देसाई यांनी या वेळी बोलताना केल्या.