काँग्रेस नेते राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावकरांचा अपमान केल्यामुळे राज्यातलं राजकारण तापलं आहे. राज्यात भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून राहुल गांधींना विरोध केला जात आहे. त्यांच्याविरोधात आंदोलनं सुरू आहेत. तर काँग्रेसकडून राहुल गांधींचं समर्थन सुरू आहे. अशा स्थितीत हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या, महाविकास आघाडीतल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची गोची झाली आहे. उद्धव ठाकरे एकाच वेळी भाजपा-शिंदे गटाला तोंड देत आहेत, तर दुसऱ्या बाजूला त्यांनी सावरकरांच्या अपमानानंतर राहुल गांधी यांनादेखील ठणकावलं.

दरम्यान, वीर सावकर यांचे पणतू रणजीत सावरकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. रणजीत सावरकर म्हणाले की, सावरकरांवरून सध्या वाद सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी सावरकरांचा राजकारणासाठी वापर करत आहेत. सावरकर हे हिंदुत्ववादाचे प्रणेते आहेत. त्यामुळे मुस्लीम मतदार आपल्या बाजूने येतील असं राहुल गांधींना वाटतं. तर दुसऱ्या बाजूला हिंदुत्ववादी पक्ष अंतर्गत राजकारणासाठी सावरकरांचा वापर करत आहेत.

HM Shri Amit Shah Public Meeting in Akola
“संविधान बदलणार नाही,” अमित शाह यांचा पुनरुच्चार; म्हणाले, “एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण”
loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस : निवडणुकीत मुख्य मुद्दयांचा विसर
What Satej Patil Said?
सतेज पाटील यांचा हल्लाबोल, “भाजपा देशपातळीवर २१४ जागांच्या वर जात नाही, कार्यकर्त्यांना गाजर..”
Satyaki Savarkar
Rahul Gandhi Case : “पोलीस तपासांत एवढा विलंब का?”, सात्यकी सावरकर यांचा थेट सवाल

“ठाकरे मुख्यमंत्री असताना काँग्रेसच्या मुखपत्रातून सावरकरांवर अश्लील टीका”

रणजीत सावरकर म्हणाले की, स्वातंत्र्यवीरांचा आदर करणारे नेते शिवसेनेप्रमाणे काँग्रेसमध्ये देखील आहेत. परंतु ते जर या अपमानाच्या वेळी आवाज उठवत नसतील तर त्याला काही अर्थ नाही. सावकरांच्या अपमानामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनादेखील दुःख झालं आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना काँग्रेसच्या शिदोरी मासिकातून सावरकरांवर अश्लील टीका झाली. परंतु उद्धव ठाकरे यांनी त्यावर कारवाई केली नाही. परंतु शरद पवारांची बदनामी करणाऱ्या अभिनेत्रीवर लगेच कारवाई झाली.

हे ही वाचा >> ‘धर्मवीर’ सिनेमात ‘वसंत डावखरे’ साकारणाऱ्या अभिनेत्याचा शिवसेनेत प्रवेश, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला भगवा

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल बोलताना रणजीत सावरकर म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या अल्टीमेटमनंतरही राहुल गांधी त्यांच्या भूमिकेवरून हटलेले नाहीत. तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसची साथ सोडली नाही. पक्षीय स्वार्थामुळे शिवसेनेत फूट पडली आहे.